
शगुफ्ता रफिक यांनी कठीण परिस्थितीतून संघर्ष करत पुढे येत हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी लेखिका म्हणून नाव कमावले.
१७ व्या वर्षी वेश्याव्यवसायात अडकलेल्या शगुफ्ताच्या आयुष्यात महेश भट यांच्या भेटीनंतर बदल घडून आला.
‘आशिकी २’, ‘मर्डर २’, ‘राज २’ यांसारख्या हिट चित्रपटांची पटकथा लिहून त्यांनी बॉलिवूडमध्ये ठसा उमटवला.
आशिकी २ हा श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर या दोघांच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरला होता. १५ कोटींचे बजेट असणाऱ्या चित्रपटाने १०० कोटींचा पल्ला गाठला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केली होती. आशिकी २ हा चित्रपट शगुफ्ता रफिक यांनी लिहिला होता. आशिकी २ व्यतिरिक्त वो लम्हे, आवारापन, राज २, मर्डर २ असे लोकप्रिय चित्रपट शगुफ्ता यांनी लिहिले आहेत. ब्लॉकबस्टर चित्रपट लिहिणारी लेखिका वयाच्या १७ व्या वर्षी वेश्याव्यवसायात सक्रीय होती.
शगुफ्ता या त्यांच्या आईसोबत गरीबीचे जीवन जगत होत्या. जेव्हा महेश भट यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांचे जीवन बदलले. ज्या फ्लॅटमध्ये शगुफ्ता रफिक राहायच्या, तेथील वातावरण वेश्यालयाप्रमाणे होते. १७ वर्षांची होईपर्यंत त्या डान्सर म्हणून काम करत असत. जमिनीवर पडलेल्या पैश्यांवर त्यांचा उदरनिर्वाह होत असे. १७ व्या वर्षी शगुफ्ता रफीक यांनी वेश्या म्हणून काम केले. जीवनातील संघर्षाबाबत शगुफ्ता रफिक यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत शगुफ्ता म्हणाल्या, 'मला एका रात्रीचे तीन हजार रुपये मिळायचे. दहा वर्ष मी हे काम करत होते. मला दुबईमध्ये बार डान्सर होण्याचा कुणीतरी सल्ला दिला. त्यानंतर मी दुबईला गेले. सुरुवातीचे काही दिवस घाबरत काढले. पण नंतर मला ४५ वर्षीय व्यक्ती भेटला, त्याने माझ्यावर पैशांचा वर्षाव केला. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. त्याने लग्नाचा प्रस्ताव दिला. पण आमचं लग्न झालं नाही.'
'१९९९ मध्ये माझ्या आईला कॅन्सर झाल्याचे मला समजले. तेव्हा मी दुबई सोडून भारतात परतले. २००२ मध्ये महेश भटशी माझी ओळख झाली. तेव्हा मी लिखाणाची इच्छा व्यक्त केली होती. मी एका चाळीमध्ये राहत होते. घाणेरड्या उशांवर, गाद्यांवर झोपले होते. त्याजागी असंख्य मुली पूर्वी झोपल्या होत्या. त्यांनी अनेक पुरुषांचे मनोरंजन केले होते. या सर्वांबद्दल मला लिहायचे होते', असे शगुफ्ता रफिक यांनी म्हणाल्या होत्या. २००६ मध्ये शगुफ्ता यांनी चित्रपटात लिखाणाची संधी मिळाली. त्याच्या कारकीर्दीची सुरुवात मोहित सुरीच्या 'कलयुग' चित्रपटापासून झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.