Vicky Kaushal React Katrina Kaif Pregnancy Rumours Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vicky Kaushal And Katrina Kaif News : कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांवर विकी कौशल पहिल्यांदाच बोलला; म्हणाला, "योग्य वेळ आली की सांगेल..."

Vicky Kaushal React Katrina Kaif Pregnancy Rumours : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ प्रेग्नेंट असल्याची चर्चा अनेकदा सोशल मीडियावर झालेली आहे. प्रेग्नेंसीच्या ह्या चर्चांवर विकी कौशलने प्रतिक्रिया दिलेली आहे.

Chetan Bodke

गेल्या काही दिवसांपूर्वी कतरिना आणि विकी दोघंही परदेशामध्ये सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. तिची फॅशन आणि स्टाईलपाहून अनेक युजर्सने कतरिना प्रग्नेंट असल्याची शक्यता वर्तवली होती. कतरिना कैफ प्रेग्नेंसीच्या चर्चा अनेकदा झालेल्या आहेत. आता या चर्चांवर स्वत: विकी कौशलने प्रतिक्रिया दिलेली आहे.

सध्या विकी कौशल त्याच्या 'बॅड न्यूज' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटवेळी त्याने योग्य वेळ आली की मी तुम्हाला 'गुड न्यूज' सांगेल, असं सांगितलं.

"तु रियल लाईफमध्ये 'गुड न्यूज' केव्हा देणार आहेस ?"असा प्रश्न पापाराझीने विकीला विचारला होता. या प्रश्नावर त्याने हसत हसत उत्तर दिले, तो म्हणाला, "जेव्हा 'गुड न्यूज' येईल तेव्हा मी सर्वात आधी तुम्हाला सांगेन. सध्या तरी तुम्ही 'बॅड न्यूज' पाहा. पण मी जेव्हा योग्य वेळ आली की तुम्हाला सांगेन." 'बॅड न्यूज'च्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटला चित्रपटासंबंधित सर्वच कलाकार उपस्थित होते. इव्हेंटमध्ये, मीडियाने विकी कौशलला खासगी आयुष्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्याने दिलेले उत्तर ऐकून सर्वच हसू लागले.

‘बॅड न्यूज’ चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने केली असून आनंद तिवारी यांनी दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट १९ जुलै २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. रोमँटिक ड्रामा चित्रपटाचा ट्रेलर सर्वांनाच आवडला आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत विकी कौशलशिवाय तृप्ती डिमरी, एमी विर्क, आणि नेहा धूपियाही दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT