Janhavi Kapoor: जान्हवीची धर्मा प्रॉडक्शनवरुन ट्रोलिंग, करणच्या चित्रपटात काम केल्याचा मनस्ताप ?

जान्हवी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. आई श्रीदेवीच्या निधनानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचा पहिला चित्रपट 'धडक' हा होता.
Janhavi Kapor And Karan Johar
Janhavi Kapor And Karan JoharSaam Tv

Janhavi Kapoor Debue On Bollywood: दिग्दर्शक, निर्माता करण जोहर आपल्या चित्रपटातून अनेक स्टारकिड्सला बॉलिवूडमध्ये पदार्पणाची संधी देतो. करणने आपल्या चित्रपटातून अनेक कलाकारांना मनोरंजन क्षेत्रात आणले आहे. त्यातील एक स्टारकिड अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर. जान्हवी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. आई श्रीदेवीच्या निधनानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचा पहिला चित्रपट 'धडक' हा होता. आपल्या आईप्रमाणेच अभिनयातून जान्हवीने ही चाहत्यांच्या मनावर छाप सोडली आहे.

Janhavi Kapor And Karan Johar
Richa Chaddha: अभिनेत्री रिचा चड्ढानं भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप; आधी 'ते' ट्विट केलं, नंतर मागितली माफी

जान्हवी कपूर सध्या बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 2018 मध्ये शशांक खेतानच्या रोमँटिक ड्रामा चित्रपट, धडकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्यामध्ये ईशान खट्टर देखील मुख्य भूमिकेत होता.

हा 2016 मध्ये आलेल्या सैराट या मराठी चित्रपटाचा रिमेक होता. दरम्यान, धर्मा प्रॉडक्शन बॅनरखाली करण जोहर, हिरु यश जोहर आणि अपूर्व मेहता यांनी धडकची निर्मिती केली होती. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत जान्हवी म्हणाली की, करणच्या चित्रपटातून मी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्याने नेटकरी मला भरपूर ट्रोल करतात.

Janhavi Kapor And Karan Johar
Bigg Boss 16: प्रियांका-अंकितमध्ये कॉफीवरून गरमागरमी, नात्यात दुरावा येईल काय?

पुढे जान्हवीने सांगितले की, “धर्मा प्रॉडक्शनशी संबंधित असल्याने मला सहज ट्रोल केले जाते का? यावर मला वाटते की ही गोष्ट घडते कारण धर्मा हे एक नामांकित प्रॉडक्शन हाऊस आहे. ही बाब माझ्या लक्षात आली आहे, लोक जे काही बोलतात ते धर्मा प्रोडक्शनची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असल्यानेच. त्यांच्यासोबत काम केलेली प्रत्येक व्यक्ती सहज द्वेषाचा बळी ठरली आहे. ” असे उत्तर तिने दिले आहे.

Janhavi Kapor And Karan Johar
Mansi Naik: मानसीच्या पतीने सोशल मीडियावर मनातील खदखद केली व्यक्त; म्हणतो, 'माझ्याबद्दल काय बोलतात...'

पुढे, जान्हवीने पुढे सांगितले की तिला याबद्दल कधीही पश्चात्ताप होणार नाही कारण धर्मा प्रॉडक्शन आणि करणने तिला जे काही दिले आहे त्यामुळे ती स्वत:ला फार भाग्यवान समजते, धर्मा प्रॉडक्शनने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा आदर करते.

जान्हवी म्हणते, मला करण जोहरकडून चित्रपटांमध्ये लागणारा आत्मविश्वास, प्रेम आणि लाभदायक मार्गदर्शन मिळाले होते. असे ती यावेळी म्हणाली. जान्हवीचा धडक चित्रपटाव्यतिरिक्त 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' हा चित्रपट देखील केला होता.

Janhavi Kapor And Karan Johar
Shriya Saran: श्रीयाला पतीचे चुंबन घेणं आवडतं; म्हणते, 'हे तर नॉर्मल…'

जान्हवीचा अखेरचा चित्रपट मथुकुट्टी झेवियर दिग्दर्शित 'मिली' हा होता. यात सनी कौशल आणि मनोज पाहवा देखील मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट 2019मधील मल्याळम भाषेतील हेलन चित्रपटाचा रिमेक होता. नंतर जान्हवी नितेश तिवारीच्या 'बवाल' चित्रपटामध्ये वरूण धवनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मिस्टर अँड मिसेस माही चित्रपटात राजकुमार रावसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com