Mansi Naik: मानसीच्या पतीने सोशल मीडियावर मनातील खदखद केली व्यक्त; म्हणतो, 'माझ्याबद्दल काय बोलतात...'

मानसीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पतीला काही टोमणे मारले होते, त्यालाच प्रत्युत्तर म्हणून त्याने ही तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून टोमणे मारले आहेत.
Manasi Naik
Manasi Naik Saam Tv

Mansi Naik : 'वाट बघतोय रिक्षावाला' फेम मानसी नाईक सध्या बरीच प्रकाशझोतात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पती प्रदीप खरेरासोबत घटस्फोट झाल्याची चर्चा होत होती. तिने एका इंग्रजी संकेतस्थळाला मुलाखत दिली होती की, 'हो मी घटस्फोट घेतेय. त्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे' असं मानसीने स्पष्ट सांगितले आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पतीला काही टोमणे मारले होते, त्यालाच प्रत्युत्तर म्हणून त्याने ही तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून टोमणे मारले आहेत.

Manasi Naik
Mansi Naik Divorce: मानसी नवऱ्यापासून विभक्त होणार, 'हो मी घटस्फोट घेतेय' म्हणत केले महत्वाचे खुलासे

नेहमीच दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. मानसीचा पती प्रदीप खरेराच्या काही पोस्ट सोशल मीडियावर सध्या बरेच चर्चेत येत आहे. त्यांनी लग्नानंतर बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या, पण त्या दोघांनीही पोस्ट्स डिलीट केल्या आहेत. दोघांच्याही रील नेहमीच चर्चेचा विषय असायचा. पण त्या रील सुद्धा त्यांनी डिलीट केल्या आहेत.

Manasi Naik
Shriya Saran: श्रीयाला पतीचे चुंबन घेणं आवडतं; म्हणते, 'हे तर नॉर्मल…'

त्यातच मानसीच्या पतीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. प्रदीपने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणतो की, ‘इतर कोण माझ्याबद्दल काय बोलतं याचा मला फरक पडत नाही. कारण मला माहित आहे मी कोण आहे आणि याचा मला अभिमान आहे.’ अशा आशयाची त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रदीप मूळचा हरियाणाचा असून तो मॉडेल आणि बॉक्सर आहे.

मानसी नाईकने प्रदीप खरेरा सोबत जानेवारी 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. दोघांनीही आपल्या नात्याची अधिकृत घोषणा दोघांनीही 2020 मध्ये केली होती. लग्नाआधी पासून ते एकमेकांना ओळखत असल्याने लग्नाआधी काही काळ रिलेशनशिप मध्येही राहिले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com