Vicky Kaushal On Katrina Kaif Pregnancy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vicky Kaushal On Katrina Kaif Pregnancy : कतरिना कैफ खरंच प्रेग्नंट आहे का? विकी कौशलने दिलं प्रामाणिक उत्तर

Vicky Kaushal And Katrina Kaif News : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या प्रेग्नेन्सीच्या चर्चांना उधाण आले आहे. 'बॅड न्यूज' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेता विकी कौशलने पापाराझींना दिलं आहे.

Rutuja Kadam

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या प्रेग्नेन्सीच्या चर्चांना उधाण आले आहे. ती गरोदर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कतरिना आणि विकी लंडनमध्ये गेले होते. त्यावेळी तिच्या लूकमुळे ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कतरिना प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच विकी आणि कतरिना अनंत-राधिका यांच्या लग्नसोहळ्यात दिसून आले. दरम्यान, अशातच विकी कौशलने प्रेग्नेंसीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

विकी कौशलचा 'बॅड न्यूज' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासंदर्भात तो विविध ठिकाणी प्रमोशन करतो आहे. प्रमोशनदरम्यान पॅपराझींनी कतरिनाविषयीचा प्रश्न विचारला नसता तरच नवल! अखेर पॅपराझींनी विकीला कतरिना प्रेग्नंट आहे का? असा थेट सवाल केला. यावर विकी म्हणाला, "जेव्हा गुडन्यूज येईल तेव्हा ती तुम्हा सर्वांसोबत शेअर करताना आम्हाला नक्कीच सर्वाधिक आनंद होईल. पण, सध्या या सर्व अफवा आहेत. त्यामुळे त्यावर विश्वास न ठेवता आता फक्त तुमच्या भेटीला येत असलेला 'बॅड न्यूज' एन्जॉय करा."

लंडनमध्ये स्पॉट केल्यानंतर खरंतर प्रेगनन्सीच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर कतरिना भारतात आली. यावेळी तिचे एअरपोर्ट लूकसुद्धा प्रचंड व्हायरल झाले. ढगळ्या, ओव्हरसाइज आणि मोठ्या जॅकेटमध्ये दिसल्यामुळे त्याचा थेट संबंध प्रेग्नेन्सीशी जोडला जाऊ लागला.

अद्याप याबद्दल कतरिना कैफने थेट कोणतेही भाष्य केलेले नाही. आणि या सर्व चर्चांना आता विकीनेच पूर्णविराम दिलाय. अनेकदा आपल्या हटक्या लव्हस्टोरीमुळे तर कधी त्यांच्या रोमँटिक अंदाजामुळे विकी- कतरिना चर्चेत असतात. विकी कौशल आणि कतरिना कैफ 9 डिसेंबर 2021 रोजी लग्नबंधनात अडकले.

विकी-कतरिना राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये लग्नबंधनात अडकले. दोघांच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. बॉलिवूडमधील सर्वाधिक आवडीचं असं हे कपल आहे. विकी आणि कतरिनाची लव्हस्टोरी चाहत्यांना प्रचंड भावते. त्यामुळे ते गुडन्यूज कधी देणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

ठाकरे गटाला भाजपचा जबरदस्त धक्का! २ बडे नेते मशाल सोडून कमळ हाती घेणार, कार्यकर्तेही भाजपच्या वाटेवर

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

SCROLL FOR NEXT