Vicky- Katrina Viral Video : विकी-कतरिनाचा लंडनमधील नवा व्हिडीओ व्हायरल, ट्रोलर्सने पापाराझींना चांगलंच झापलं

Vicky Kaushal And Katrina Kaif London Viral Video : सध्या सोशल मीडियावर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लंडनमधील एका व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे. व्हिडीओपाहून नेटकरीही कतरिना प्रग्नेंट असल्याची प्रतिक्रिया देत आहे.
Vicky- Katrina Viral Video : विकी- कतरिनाचा लंडनमधील नवा व्हिडीओ व्हायरल, ट्रोलर्सने पापाराझींची केली कानउघडणी
Vicky Kaushal And Katrina Kaif London Viral VideoInstagram

विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील फेमस कपलपैकी एक आहे. या कपलची कायमच सोशल मीडियावर चर्चा होत असते. सध्या हे कपल लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. अशातच या कपलचा लंडनमधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे कतरिना प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. खरंतर कतरिनाने गेल्या अनेक दिवसांपासून प्रेग्नंट असल्याची बातमी लपवून ठेवली आहे. अशातच तिच्या ह्या लंडनमधील व्हिडीओने ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आहे आहे.

Vicky- Katrina Viral Video : विकी- कतरिनाचा लंडनमधील नवा व्हिडीओ व्हायरल, ट्रोलर्सने पापाराझींची केली कानउघडणी
Dalljiet Kaur Interview : दलजीत कौरच्या आरोपांवर दुसऱ्या पतीने सोडलं मौन, निखिल पटेलने सांगितलं लग्न मोडल्याचं कारण

विकी- कतरिनाचा हा नवा व्हिडीओ एका पापाराझीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. त्या व्हिडीओमध्ये, विकी आणि कतरिना एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना दिसत आहे. पुढे ते रस्ता ओलांडताना दिसत आहेत. रस्ता ओलांडत असताना कतरिनाचं लक्ष एका पापाराझीकडे जातं. ते पाहून तिने विकीचा हात मागे खेचला आणि पुन्हा ते मागे फिरतात. सध्या व्हिडीओवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

व्हिडिओ पाहून नेटकरी पापाराझींवर चांगलेच भडकले आहेत. नेटकऱ्यांनी पापाराझींना चांगलंच झापलं आहे. "पापाराझींनी सेलिब्रिटींचं गुपचूप व्हिडीओ शुटिंग करणं थांबवावं.", "कतरिना पूर्वी पासून प्रायव्हेट पर्सन आहे, तुम्ही तिला का त्रास आहे.", "सेलिब्रिटीज पब्लिक प्रॉपर्टी नाही.", "सेलिब्रिटीज असले तरीही त्यांच्या इमोशनचा आदर करावा." अशा अनेक वेगवेगळ्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत.

Vicky- Katrina Viral Video : विकी- कतरिनाचा लंडनमधील नवा व्हिडीओ व्हायरल, ट्रोलर्सने पापाराझींची केली कानउघडणी
Sunny Deol News: मुलाच्या लग्नासाठी घेतले होते उधार पैसे, प्रसिद्ध निर्मात्याचा सनी देओलवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली व्हिडीओपाहून नेटकऱ्यांना कतरिना प्रग्नेंट असल्याचे वाटत आहे. कतरिना आणि विकीच्या जवळच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, कतरिना लंडनमध्येच बाळाला जन्म देणार असल्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिचा एक लंडनमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओपासून तिच्या प्रग्नेंसीची चर्चा होत आहे. अद्याप विकी- कतरिनाने प्रग्नेंसीबद्दल कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यांच्या टीमने या निव्वळ अफवा असल्याच्या चर्चा सांगितले आहे.

Vicky- Katrina Viral Video : विकी- कतरिनाचा लंडनमधील नवा व्हिडीओ व्हायरल, ट्रोलर्सने पापाराझींची केली कानउघडणी
Natasa Stankovic Net Worth: हार्दिक पंड्याच्या बायकोचा थाटच न्यारा, लग्न करून करियरला रामराम केले तरी कमावते कोट्यवधी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com