Dalljiet Kaur Interview : दलजीत कौरच्या आरोपांवर दुसऱ्या पतीने सोडलं मौन, निखिल पटेलने सांगितलं लग्न मोडल्याचं कारण

Dalljiet Kaur And Nikhil Patel Confirm Separation : गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दलजीत कौरने इन्स्टा स्टोरी शेअर करत पती निखिल पटेलवर अनेक आरोप केले. अशातच या सर्व प्रकरणावर तिच्या पतीने आपली बाजू मांडली आहे.
Dalljiet Kaur Interview : दलजीत कौरच्या आरोपांवर दुसऱ्या पतीने सोडलं मौन, निखिल पटेलने सांगितलं लग्न मोडल्याचं कारण
Dalljiet Kaur And Nikhil Patel DivorceSaam Tv

सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री दलजीत कौर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने जून २०२३ मध्ये उद्योगपती निखिल पटेलसोबत दुसरं लग्न करत केनियामध्ये संसार थाटला. ती पेशाने अभिनेत्री असून तिचा पती उद्योगपती आहे. या कपलने लग्नाच्या अवघ्या १० महिन्यांनीच घटस्फोट घेतला आहे. ती नुकतीच आपल्या मुलासोबत भारतात परतली असून तिने लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने इन्स्टा स्टोरी शेअर करत आपल्या पतीचं अफेअर असल्याचं तिने सांगितलं आहे. अशातच या सर्व प्रकरणावर तिच्या पतीने प्रतिक्रिया दिली आहे.

Dalljiet Kaur Interview : दलजीत कौरच्या आरोपांवर दुसऱ्या पतीने सोडलं मौन, निखिल पटेलने सांगितलं लग्न मोडल्याचं कारण
Sunny Deol News: मुलाच्या लग्नासाठी घेतले होते उधार पैसे, प्रसिद्ध निर्मात्याचा सनी देओलवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

उद्योगपती निखिल पटेलने ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये दलजीतने तिच्या मुलासोबत भारतात येण्याचा निर्णय घेतला होता आणि तेव्हापासूनच आम्ही दोघेही एकमेकांपासून वेगळे झालो. जितका आमच्या कुटुंबाचा पाया मजबूत व्हायला हवा होता, तो तितका झाला नाही. मी आणि दलजितने मार्च २०२३ मध्ये, भारतीय विवाहपद्धतीनुसार लग्न केलं. या विवाहाला सांस्कृतिक मान्यता असली तरीही ते कायदेशीररित्या बंधनकारक नव्हतं."

पुढे मुलाखतीमध्ये, निखिल पटेल म्हणाला, "लग्न करण्याचा आमचा काही हेतू होता. दलजीत माझ्यासोबत केनियाला शिफ्ट होणार असल्याचं आश्वासन तिच्या कुटुंबाला मिळावं. आम्ही दोघांनी अनेक प्रयत्न केले, पण आमच्या अनेक प्रयत्नांनंतर दलजीतसाठी केनियामध्ये राहणं खूप आव्हानात्मक झालं होतं. तिला तिच्या भारतातल्या करियरची खूप आठवण येत होती. वेगवेगळ्या संस्कृती, वेगळ्या श्रद्धा आणि मूल्यामुळे आम्हाला आमचं नातं टिकवणं फार आव्हानात्मक होतं. आम्ही नात्यात अनेक गोष्टींचा विचार करुन निर्णय घेत होतो. ज्या दिवशी दलजितला भारतात यायचं होतं, त्या दिवशी तिने मला सांगितले होतं. मी तिचं सर्व सामान सुरक्षितरित्या ठेवलं आहे. तिचं केनियातून जाणं हाच आमच्या नात्याचा शेवट होता."

Dalljiet Kaur Interview : दलजीत कौरच्या आरोपांवर दुसऱ्या पतीने सोडलं मौन, निखिल पटेलने सांगितलं लग्न मोडल्याचं कारण
Natasa Stankovic Net Worth: हार्दिक पंड्याच्या बायकोचा थाटच न्यारा, लग्न करून करियरला रामराम केले तरी कमावते कोट्यवधी

मुलाखतीच्या शेवटच्या भागामध्ये निखिलने सांगितले की, "दलजितने गेल्या काही दिवसांपूर्वी इन्स्टा स्टोरी शेअर केली होती, त्यामुळे आमच्यामध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत. तिच्या पोस्टचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. तिच्या पोस्टमुळे नातेवाईकांना आणि मित्रांना खूप त्रास होतोय. त्यामुळे ती चुकीचं वागणं थांबवेल, अशी मी आशा करतो." यासोबतच निखिलने दलजितला भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छाही दिलेल्या आहेत.

Dalljiet Kaur Interview : दलजीत कौरच्या आरोपांवर दुसऱ्या पतीने सोडलं मौन, निखिल पटेलने सांगितलं लग्न मोडल्याचं कारण
Faisal Malik Interview : 'राजकारणात सेलिब्रिटींनी पडू नये...', कंगना रणौतच्या राजकारणातल्या एन्ट्रीवर 'पंचायत' फेम अभिनेत्याचं मत

दलजित आपल्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिली आहे. तिचं पहिलं लग्न अभिनेता शालिन भानोतसोबत झालेले होते. पण ते दोघेही फक्त दोन वर्षातच विभक्त झाले. त्यांना त्यांना जेडन नावाचा मुलगा आहे. त्याचा सांभाळ दलजित करते. तर गेल्या वर्षी जून २०२३ मध्ये मुंबईत दलजितने निखिल पटेलसोबत लग्न केले होतं. त्याचं ही दलजितसोबतचं दुसरं लग्न आहे. पहिल्या पत्नीकडून निखिलला दोन मुली आहेत.

Dalljiet Kaur Interview : दलजीत कौरच्या आरोपांवर दुसऱ्या पतीने सोडलं मौन, निखिल पटेलने सांगितलं लग्न मोडल्याचं कारण
Amhi Jarange Film : ‘आम्ही जरांगे- गरजवंत मराठ्यांचा लढा’ मध्ये मनोज जरांगे पाटलांची भूमिका कोण साकारणार ?; टीझर रिलीज, पाहा Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com