Bad News Movie : तृप्ती डिमरीसाठी ‘बॅड न्यूज’ ठरला गुड न्यूज देणारा चित्रपट, ‘ॲनिमल’च्या सक्सेसनंतर फीमध्ये घसघशीत वाढ

Trupti Dimri Bad News Movie Fees : तृप्ती विकी कौशलसोबत ‘बॅड न्यूज’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटासाठी तिने मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे.
Bad News Movie : तृप्ती डिमरीसाठी ‘बॅड न्यूज’ ठरला गुड न्यूज देणारा चित्रपट, ‘ॲनिमल’च्या सक्सेसनंतर फीमध्ये घसघशीत वाढ
Trupti Dimri Bad News Movie FeesSaam Tv
Published On

‘ॲनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आणि प्रकाश झोतात आला. ह्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीमध्ये समाविष्ट झाला. या चित्रपटातून अनेक कलाकार चांगलेच चर्चेत आले. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री तृप्ती डीमरी... तृप्तीला या चित्रपटाने विशेष प्रसिद्धी मिळवून दिली. या चित्रपटानंतर तृप्तीला अनेक चित्रपट मिळाले आहेत. नुकतीच तृप्ती विकी कौशलसोबत ‘बॅड न्यूज’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटासाठी तिने मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे.

Bad News Movie : तृप्ती डिमरीसाठी ‘बॅड न्यूज’ ठरला गुड न्यूज देणारा चित्रपट, ‘ॲनिमल’च्या सक्सेसनंतर फीमध्ये घसघशीत वाढ
Bigg Boss Marathi 5 : सोशल मिडिया इन्फ्लुएंसरची ‘बिग बॉस मराठी’मध्ये होणार एंट्री, कोण आहे ती ?

‘बॅड न्यूज’ चित्रपटामध्ये तिने विकीसोबत दिलेल्या इंटीमेट सीन्सची जोरदार चर्चा होत आहे. हे सीन्स दोघांनीही ‘जानम’ गाण्यासाठी दिलेले आहेत. सध्या हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये त्या गाण्याची भलतीच क्रेझ पाहायला मिळत आहे. दरम्यान, ‘ॲनिमल’ चित्रपटासाठी ४० लाख रुपये इतके मानधन घेतले होते.

‘ॲनिमल’ चित्रपटानंतर तृप्तीच्या फॅन्स लिस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या चित्रपटापासून अभिनेत्रीने आपल्या फीमध्ये घसघशीत वाढ केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तृप्तीने ‘बॅड न्यूज’ साठी ८० लाख ते १ कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

पण असं असलं तरीही 'जानम' गाण्यामुळे तृप्तीला प्रचंड ट्रोल केलं जातंय. 'बॅड न्यूज'नंतर तृप्ती ‘भुल भुल्लैय्या ३’मध्ये दिसणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, ‘भुल भुल्लैय्या ३’ साठी ८० लाख ते १ कोटी रुपये इतके घसघशीत मानधन घेतले आहे.

Bad News Movie : तृप्ती डिमरीसाठी ‘बॅड न्यूज’ ठरला गुड न्यूज देणारा चित्रपट, ‘ॲनिमल’च्या सक्सेसनंतर फीमध्ये घसघशीत वाढ
Radhika-Anant's Wedding Return Gifts : बापरे... अनंत-राधिकाच्या लग्नात कोट्यवधींच रिटर्न गिफ्ट, सेलिब्रिटींना मिळालं २ कोटींचं घड्याळ

तृप्तीला 'नॅशनल क्रश' म्हणतात. ‘बॅड न्यूज’च्या ट्रेलर लाँचिंगच्या वेळी तृप्तीला विचारण्यात आले की, तिला या नावामुळे काही प्रोब्लेमला फेस करावे लागले का ? या प्रश्नाचं उत्तर देताना तिने सांगितले की, "माझ्या अनुभवानुसार सुदैवाने, मी देवाचे आभार मानू इच्छिते. कारण, मी फिल्मी करियरमध्ये जे काही चित्रपट केले आहेत, ते सर्व अगदी विरुद्ध आहेत. मग ते सर्वच चित्रपट असो, अगदी पूर्वीचे किंवा आत्ताचे. मी काम केलेल्या सर्वच चित्रपटांमधून मला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिलेला आहे. चाहत्यांना माझे काम आवडले आहे. सुरुवातीला जेव्हा मी इंडस्ट्रीत आले, तेव्हा मला नेहमीच वाटायचे की, लोकांनी माझ्या कामाबद्दल बोलावे आणि दुसरे काही नको. सुदैवाने, जेव्हा माझे चित्रपट प्रदर्शित झाले, तेव्हा ते माझ्या कामाबद्दल बोलले."

तृप्तीने ‘लैला मजनू’, ‘बुलबुल’ आणि ‘काला’ सारख्या चित्रपटांत तिने काम केले आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूर स्टारर संदीप रेड्डी वांगाच्या ‘ॲनिमल’मध्ये तृप्ती प्रमुख भूमिकेत होती. या ॲक्शनपटात रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरीसोबत रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल आणि शक्ती कपूर देखील होते. लवकरच तृप्ती आनंद तिवारी दिग्दर्शित ‘बॅड न्यूज’ मध्ये दिसणार आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भुल भुल्लैय्या ३’मध्ये ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २०२४ च्या दिवाळीत थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Bad News Movie : तृप्ती डिमरीसाठी ‘बॅड न्यूज’ ठरला गुड न्यूज देणारा चित्रपट, ‘ॲनिमल’च्या सक्सेसनंतर फीमध्ये घसघशीत वाढ
Anant- Radhika Wedding : सप्तपदी घेतल्यानंतर राधिका- अनंतने मंडपातच दिले एकमेकांना खास वचन, चाहत्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com