Vicky Kaushal-Katrina Kaif: विकी- कतरिनाच्या घरी नवा पाहुणा येणार? लंडनमधील त्या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

Vicky Kaushal-Katrina Kaif Viral Video: बॉलिवूडमधील विकी कौशल आणि कतरिना कैफ हे एक पॉवर कपल आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते.
Vicky Kaushal-Katrina Kaif
Vicky Kaushal-Katrina KaifSaam Tv

बॉलिवूडमधील विकी कौशल आणि कतरिना कैफ हे एक पॉवर कपल आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेऊन चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यांनी लग्नाची माहिती खूप वेळ चाहत्यांपासून लपवून ठेवली होती. त्यानंतर आता कतरिना प्रेग्नंट असल्याचीही बातमी लपवून ठेवल्याच्या चर्चांना उधाण आहे आहे. या चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे विकी कौशल आणि कतरिना कैफचा व्हायरल झालेला व्हिडिओ. या व्हिडिओमुळेच विकी आणि कतरिनाच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

विकी कौशल आणि कतरिना कैफ सध्या लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. या दोघांचा लंडनमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावरुनच कतरिना प्रेग्नंट असल्याची शंका चाहत्यांना आली आहे. व्हायरल व्हिडिओत कतरिनाचा लूक हा फार वेगळा दिसत आहे. त्यामुळेच ती गरोदर असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.

झूम टीव्हीच्या रिपोर्टनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी तयार आहेत. कतरिवा लंडनमध्ये आपल्या बाळाला जन्म देणार आहे. विकी हा कतरिनासाठी लंडनला गेल्याचेही सांगण्यात आले आहे.

सूत्रांनी ही माहिती दिली आहे. या कपलने या माहितीवर अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. त्यामुळे कतरिना खरच प्रेग्नंट आहे की नाही याबाबत माहिती समोर आलेली नाही.

Vicky Kaushal-Katrina Kaif
Mukta Barve: '...त्याच्याशीच मी लग्न करेन'; मुक्ता बर्वेची मिस्टर परफेक्टसाठी स्पेशल अट

विकी कौशल आणि कतरिना कैफबद्दल बोलायचे तर, विकी कौशल लवकरच छावा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर कतरिना कैफ लवकरच चंदू चॅम्पियन या चित्रपटात दिसणार आहे.

Vicky Kaushal-Katrina Kaif
HBD Suhana Khan: शाहरुखची लेक सुहाना झाली २४ वर्षांची; कोट्यवधी रुपयांची आहे मालकीण, जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com