Yashwant Sardeshpande Death SAAM TV
मनोरंजन बातम्या

Yashwant Sardeshpande Death : अचानक छातीत दुखायला लागलं...; प्रसिद्ध निर्माता काळाच्या पडद्याआड, सिनेसृष्टीवर शोककळा

Yashwant Sardeshpande Passed Away: प्रसिद्ध अभिनेते, निर्माते यशवंत सरदेशपांडे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 62 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

Shreya Maskar

प्रसिद्ध चित्रपट निर्माते यशवंत सरदेशपांडे यांचे निधन झाले आहे.

यशवंत सरदेशपांडे यांनी वयाच्या 62 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

यशवंत सरदेशपांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बंगळुरू येथे निधन झाले आहे.

मनोरंजनसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते यशवंत सरदेशपांडे (Yashwant Sardeshpande) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 62 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. यशवंत सरदेशपांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बंगळुरू येथे निधन झाले आहे. यशवंत सरदेशपांडे यांनी कन्नड मनोरंजनसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे.

यशवंत सरदेशपांडे यांनी अनेक नाटक केली आहेत. कन्नड रंगभूमी गाजवली आहे. यशवंत सरदेशपांडे यांचे सोमवारी 29 सप्टेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले आणि ते बेशुद्ध पडले. त्यांना त्वरित फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना शुद्धीवर आणण्यात अपयश आले. रविवारी धारवाड येथे त्यांनी नाटकाचा प्रयोग केला होता आणि सोमवारी त्यांचे निधन झाले.

यशवंत सरदेशपांडे हे 'नागेया सरदार' म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म विजापूर जिल्ह्यात बसवाना बागेवाडी तालुक्यात उक्कली गावात झाला. ते लहानपणापासून नाटक क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी थिएटर स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतले. तसेच नाट्यशास्त्र विषयात डिप्लोमा केला. यशवंत सरदेशपांडे यांनी 1996 मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठातून सिनेमा आणि नाट्यलेखनाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला.

यशवंत सरदेशपांडे हे प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेते होते. ते विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. यशवंत सरदेशपांडे यांच्या पत्नी मालती सरदेशपांडे देखील एक उत्तम अभिनेत्री आहेत. यशवंत सरदेशपांडे यांच्या निधनाने सरदेशपांडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यशवंत सरदेशपांडे यांनी टेलिव्हिजनवर देखील काम केले आहे. तसेच त्यांचे 'ऑल द बेस्ट' हे नाटक खूप गाजले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागा नदीने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

Rhea Chakraborty : ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीला सर्वात मोठा दिलासा, मुंबई हाय कोर्टात नेमकं काय झालं?

मुंबईत भाजप १२५ जागांवर लढणार; शिंदे, अजित पवारांच्या वाट्याला किती? जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर

Maha Navami 2025: महानवमीच्या दिवशी घरात ठेवा 'या' पारंपरिक गोष्टी, मिळेल देवी दुर्गेचा आशीर्वाद

Asia Cup 2025: ...तेव्हाच मी ट्रॉफी भारताला देईन! ट्रॉफी चोर नकवींचा नवीन ड्रामा; घातली विचित्र अट

SCROLL FOR NEXT