Sonu Sood : सोनू सूदचा दिलदारपणा! सोलापूरकरांसाठी धावला; पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात, पाहा VIDEO

Sonu Sood -Solapur Flood : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. व्हिडीओत अभिनेता नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.
Sonu Sood -Solapur Flood
Sonu SoodSAAM TV
Published On
Summary

सोलापूरमध्ये आलेल्या पूरामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.

अभिनेता सोनू सूदने पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

सोनू सूद कायम गरजूंना मदत करताना दिसतो.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) हा कायम गरजूंना मदत करताना दिसतो. त्यांनी आजवर अनेक कुटुंबांची वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली आहे. अलिकडेच पंजाबमधील पूरग्रस्त गावांना मदत करण्यासाठी स्वतः सोनू सूद पंजाबला पोहचला होता. आता पंजाबनंतर सोनू सूद सोलापूरच्या मदतीला पुढे सरसावला आहे. सोलापूरमध्ये (Solapur Flood) सीना नदीला पूर आला. ज्यामुळे सोलापूरचे मोठे नुकसान झाले आहे.

सोनू सूद हा सामाजिक कार्यासाठी ओळखला जातो. सोनू सूदने सोशल मीडियावर पोस्ट करून सोलापूर पूरग्रस्तांच्या मदतीची माहिती दिली आहे. त्याने व्हिडीओत म्हटल्याप्रमाणे, सोनू सूदची टीम सोलापूरमधील गरजू कुटुंबांना खाण्याचे, मेडिकल कीट्स पोहोचवण्याचे काम करत आहेत. तसेच लवकरच सोनू सूद स्वतः सोलापूरामध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाणार आहे.

व्हिडीओच्या माध्यमातून सोनू सूदने लोकांना मदतीसाठी आव्हान केले आहे. तसेच सध्या सोनू सूदवर चाहत्यांकडून प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोनू सूदने करोना काळात देखील अनेक कुटुंबांना मदत केली आहे. त्याला 'Real Life Hero' या नावाने आता सर्वत्र ओळखले जाते. त्याचे हे मदत कार्य दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तसेच त्यांच्या या कार्यात अनेक लोक सहभागी होत आहे.

वर्कफ्रंट

अभिनेता सोनू सूदने अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. 2002 मध्ये रिलीज झालेल्या 'शहीद-ए-आझम' या चित्रपटातून सोनू सूदने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्याने 'आर राजकुमार', 'सिंबा', 'विक्रम राठोड' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या खलनायकाच्या भूमिका खूप लोकप्रिय झाल्या आहेत.

Sonu Sood -Solapur Flood
Box Office Collection : 'जॉली एलएलबी 3', 'होमबाउंड' की 'ओजी'; बॉक्स ऑफिसवर कोणाची हवा? वाचा संडेचं कलेक्शन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com