Box Office Collection : 'जॉली एलएलबी 3', 'होमबाउंड' की 'ओजी'; बॉक्स ऑफिसवर कोणाची हवा? वाचा संडेचं कलेक्शन

Jolly LLB 3 vs Homebound vs OG : 'जॉली एलएलबी 3', 'होमबाउंड' , 'ओजी' या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात.
Jolly LLB 3 vs Homebound vs OG
Box Office CollectionSAAM TV
Published On
Summary

बॉक्स ऑफिसवर 'जॉली एलएलबी 3', 'होमबाउंड' , 'ओजी' हे तीन चित्रपट पाहायला मिळत आहे.

'जॉली एलएलबी 3' चित्रपट 19 सप्टेंबरपासून चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे.

भारताने ऑस्करसाठी 'होमबाउंड' या चित्रपटाची निवड केली.

सध्या बॉक्स ऑफिसवर तीन चित्रपट एकमेकांना तगडी टक्कर देताना पाहायला मिळत आहेत. यात अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी 3', ईशान खट्टरचा 'होमबाउंड' आणि पवन कल्याण यांचा 'दे कॉल हिम ओजी' यांचा समावेश आहे. 'होमबाउंड' (Homebound) चित्रपट 26 सप्टेंबर रिलीज झाला आहे. तर 'दे कॉल हिम ओजी' (They Call Him OG) चित्रपट 25 सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. 'जॉली एलएलबी 3' (Jolly LLB 3) 19 सप्टेंबरपासून चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे.

'होमबाउंड' बॉक्स ऑफिस कलेक्शन

भारताने ऑस्करसाठी 'होमबाउंड' या चित्रपटाची निवड केली. 'होमबाउंड' चित्रपटात जान्हवी कपूर, ईशान खट्टर आणि विशाल जेठवा मुख्य भूमिकेत झळकले आहेत. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'होमबाउंड' चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 30 लाख, दुसऱ्या दिवशी 50 लाख रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने रविवारी तिसऱ्या दिवशी 52 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 1.32 कोटी रुपये झाले आहे.

'जॉली एलएलबी 3' बॉक्स ऑफिस कलेक्शन

अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी 3' चित्रपट 100 कोटींपासून काही पावले दूर आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'जॉली एलएलबी 3' चित्रपटाने पहिल्या शुक्रवारी 12.5 कोटी रुपयांची कमाई केली. शनिवारी 20 कोटी आणि रविवारी 21 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. ज्यामुळे चित्रपटाच्या पहिल्या वीकेंड चांगली कमाई झाली.

'जॉली एलएलबी 3' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 74 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या शुक्रवारी, 'जॉली एलएलबी 3' ने 3.75 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर शनिवारी 6.5 कोटी आणि रविवारी 6.25 कोटी रुपये कमावले आहेत. दहा दिवसांत 'जॉली एलएलबी 3' बॉक्स ऑफिसवर 90.50 चा गल्ला जमावला आहे. तसेच जगभरात चित्रपटाने 125 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

'ओजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'ओजी' चित्रपटात मुख्य भूमिकेत पवन कल्याण आणि इमरान हाश्मी झळकले आहेत. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'ओजी' चित्रपटाने पहिल्या रविवारी 18.50 कोटींची कमाई केली. चित्रपटाने चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर 140 कोटींच्यावर कमाई केली आहे. तर चित्रपटाने जगभरात 200 कोटी रुपयांचा गल्ला ओलांडला आहे.

Jolly LLB 3 vs Homebound vs OG
Aai Tuljabhavani : सुरक्षा, आनंद, शांती अन् वैभव...; 'आई तुळजाभवानी' मालिकेत साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com