'जॉली एलएलबी 3' चित्रपट 19 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला.
'जॉली एलएलबी 3'चे दिग्दर्शक सुभाष कपूर आहेत.
'जॉली एलएलबी 3'ने 5 दिवसांत 65 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
सुभाष कपूर दिग्दर्शित 'जॉली एलएलबी 3' सध्या बॉक्स ऑफिस गाजवताना दिसत आहे. चित्रपटाने फक्त 5 दिवसांत 65 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'जॉली एलएलबी 3' (Jolly LLB 3) 19 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला. चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसीची तुफान कॉमेडी पाहायला मिळत आहे. 'जॉली एलएलबी 3' कोर्टरूम ड्रामा आहे. चित्रपटाने पाचव्या दिवशी मंगळवारी किती कमावले, जाणून घेऊयात.
'जॉली एलएलबी 3' चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बंपर कमाई केली आहे. चित्रपट पहिल्या वीकेंडला हाऊसफुल दिसला. 'जॉली एलएलबी 3'ने ओपनिंग डे ला 12.5 कोटी कमावले. तर वीकेंडला शनिवारी 20 कोटी आणि रविवारी 21 कोटींची कमाई केली. ज्यामुळे कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 21 कोटी कमावले. मात्र मंगळवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट पाहायला मिळाली. चित्रपटाने फक्त 5.5 कोटी रुपये कमावले. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'जॉली एलएलबी 3' ने पाचव्या दिवशी 6.50 कोटी रुपये कलेक्शन केले आहे. ज्यामुळे चित्रपटाची आतापर्यंत एकूण कमाई 65.50 कोटी रुपये झाली आहे. या आठवड्याच्या शेवटपर्यंत चित्रपट 100 कोटींचा आकडा पार करेल अशी शक्यता आहे.
पहिला दिवस - 12.5 कोटी
दुसरा दिवस - 20 कोटी
तिसरा दिवस - 21 कोटी
चौथा दिवस - 5.5 कोटी रुपये
पाचवा दिवस - 6.50 कोटी रुपये
एकूण - 65.50 कोटी रुपये
'जॉली एलएलबी 3'साठी अक्षय कुमारने तगडं मानधन घेतले आहे. चित्रपटात अक्षय आणि अर्शदसोबतच चित्रपटात सौरभ शुक्ला, हुमा कुरेशी आणि अमृता राव हे कलाकार झळकले आहेत. 'जॉली एलएलबी 3'साठी अक्षय कुमारने तब्बल 70 कोटी मानधन घेतले आहे. तर अर्शद वारसीने 4 कोटी फी घेतली आहे. या चित्रपटात दोघेही वकिलाच्या भूमिकेत झळकले आहेत. तर चित्रपटात जजची भूमिका करणाऱ्या सौरभ शुक्ला यांना 70 लाख रुपये मिळाले. चित्रपटातील दोन अभिनेत्री हुमा कुरेशीला 2 कोटी तर अमृता रावला 1 कोटी मानधन मिळाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.