Mangalwar Upay: मंगळवारी संध्याकाळच्या वेळी करा 'हे' उपाय; हनुमानजींची सदैव राहणार कृपा

Mangalwar ke Totke: मंगळवार हा दिवस हनुमानजींना (Hanumanji) समर्पित आहे. असे मानले जाते की, या दिवशी हनुमानाची पूजा आणि आराधना केल्याने बजरंगबली लवकर प्रसन्न होतात.
Mangalwar Upay
Mangalwar Upaysaam v
Published On
Summary
  • मंगळवार हनुमानजीला समर्पित दिवस आहे.

  • लिंबाची माळ हनुमानाला अर्पण करावी.

  • लिंबू-मीठाच्या पाण्याने घराची स्वच्छता करावी.

हिंदू धर्मात मंगळवार हा दिवस भगवान हनुमानाला अर्पण मानला जातो. या दिवशी भक्त विशेषतः हनुमानाची पूजा करतात. त्याचप्रमाणे ते हनुमान चालीसेचं पठण करतात. याशिवाय त्यांना बूंदीचा नैवेद्य अर्पण करतात. असा विश्वास आहे की, नियमितपणे मंगळवारी पूजा-अर्चना केल्याने हनुमानाची विशेष कृपा लाभते.

ज्योतिष्य शास्त्रांमध्ये मंगळवारच्या दिवसासाठी काही खास उपाय सांगण्यात आलेले आहेत. यामध्ये लिंबू अत्यंत प्रभावी मानलं गेलं आहे. चला तर जाणून घेऊ या मंगळवारी लिंबाविषयी कोणते उपाय केले जाऊ शकतात आणि त्याचा कसा परिणाम होतो.

Mangalwar Upay
Do These Things To Get Out Of Depression : डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी ह्या गोष्टी करा

अडथळ्यांपासून मुक्तीसाठी लिंबूचा उपाय

मंगळवारी भगवान हनुमानाला लिंबाची माळ अर्पण करा आणि सुंदरकांड किंवा हनुमान चालीसेचं पठण करा. हा उपाय शत्रूंच्या अडचणींपासून आणि वारंवार येणाऱ्या जीवनातील अडथळ्यांपासून मुक्तता देतो असं मानलं जातं.

Mangalwar Upay
Lord Shiva: शंकर महादेवांना 'नीलकंठ' का म्हणतात? निळ्या रंगामागचं रहस्य काय?

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा उपाय

घरात सकारात्मकता वाढवण्यासाठी मंगळवारी एका बादली पाण्यात लिंबाचा रस आणि थोडेसं मीठ मिसळून त्याने लादी पुसावी. असं केल्याने घरातील नकारात्मक शक्ती नाहीशी होतं. भांडणे-क्लेश कमी होतात आणि घराचं वातावरण आनंदी व समाधानकारक बनतं.

Mangalwar Upay
Shravan Somwar: श्रावणातील पहिल्या सोमवारी शंकरासाठी हे उपाय नक्की करा; मनातील प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी उपाय

मंगळवारी रात्री १२ वाजण्यापूर्वी एखाद्या चौकात लिंबाचे चार तुकडे करून चारही दिशांना फेकून द्यावेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंदिरात जाऊन एका लिंबू हनुमानाला अर्पण करावं आणि "ॐ हं हनुमते नमः" हा मंत्र १०८ वेळा जपावा. नंतर तो नींबू घरी आणून पूजास्थानी ठेवावा. हा उपाय मोठ्या संकटांपासून मुक्तता देणारा आणि बंद झालेले नशीब उघडणारा मानला जातो.

Mangalwar Upay
Somwar che Upay: समस्या दूर होऊन घरी येणार पैसा; सोमवारच्या दिवशी शंकराच्या आशिर्वादासाठी करा 'हे' उपाय

कर्जातून मुक्ती व धनवृद्धीसाठी उपाय

जे लोक दीर्घकाळापासून कर्जाखाली दबले आहेत त्यांनी मंगळवारी एका नींबूत ८ लवंगा खोचून ते घराच्या मुख्य दरवाज्यावर टांगावं. त्याचवेळी ऋणमोचक मंगल स्तोत्राचं पठण करावं. हा उपाय कर्जमुक्ती देतो. त्याचप्रमाणे कुटुंबाची आर्थिक स्थिती बळकट करतो आणि प्रगतीची संधी वाढवतो असं मानलं जातं.

Mangalwar Upay
Somvar Ke Upay: भगवान शंकरांना प्रिय आहेत 'या' 5 गोष्टी; सोमवारच्या दिवशी अडचणींपासून मुक्ततेसाठी करा हे उपाय
Q

मंगळवारी हनुमानाला कोणती माळ अर्पण करावी?

A

लिंबाची माळ अर्पण करावी.

Q

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी काय करावे?

A

लिंबाचा रस आणि मीठ याच्या पाण्याने लादी पुसावी.

Q

नशिब उघडण्यासाठी मंगळवारी कोणता उपाय करावा?

A

चार दिशांना लिंबाचे तुकडे फेकावेत.

Q

कर्जमुक्तीसाठी कोणता उपाय प्रभावी आहे?

A

लवंगा खोचलेला निंबू दारावर टांगावा.

Q

निंबू अर्पण केल्यानंतर कोणता मंत्र जपावा?

A

"ॐ हं हनुमते नमः" हा मंत्र १०८ वेळा जपावा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com