Shravan Somwar: श्रावणातील पहिल्या सोमवारी शंकरासाठी हे उपाय नक्की करा; मनातील प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

Shravan Somwar 2025 Upay: श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित असतो. या महिन्यातील प्रत्येक सोमवार विशेषतः पवित्र मानला जातो. या वर्षीचा श्रावण महिना २१ जुलैपासून सुरू झाला असून, २८ जुलै रोजी पहिला सोमवार आहे.
Shravan Somwar 2025 Upay
Shravan Somwar 2025 Upaysaam tv
Published On
  • श्रावण महिना भगवान शिवाची पूजा आणि तपाचा पवित्र काळ मानला जातो.

  • श्रावणातील सोमवार शिवजीचा विशेष दिवस असून पूजेचं फळ वाढतं.

  • 28 जुलै 2025 रोजी पहिला श्रावणी सोमवार आणि चतुर्थी तिथी एकत्र आहे.

श्रावण महिना म्हणजेच भक्ती, श्रद्धा आणि पुजेचा काळ मानला जातो. या पवित्र महिन्यात देवी पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप केला होता अशी मान्यता आहे. यासाठी या काळात भक्त शिवशंकरांची मनोभावे पूजा केली जाते. त्याचप्रमाणे ते व्रत धरतात.

यामध्ये विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक आयुष्यात सुख-समृद्धी यावी म्हणून हे व्रत करतात. तर अविवाहित तरुण-तरुणी योग्य जोडीदार मिळावा यासाठी उपवास करत पूजन करतात.

Shravan Somwar 2025 Upay
Benefits of taking Steam: वाफ घेण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का?

श्रावण सोमवारचं खास महत्त्व

श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस शुभच असतो पण सोमवार हा शिवजींचा विशेष दिवस मानला जातो. त्यामुळे श्रावणात येणाऱ्या सोमवारचे महत्त्व आणखी वाढते. २८ जुलै २०२५ रोजीचा सोमवार श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे आणि त्याचबरोबर शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीही आहे. हे योग शिवपूजेच्या दृष्टीने अत्यंत फलदायी ठरतात.

श्रावणी सोमवारचे शुभ उपाय

रात्री शिवपूजन आणि खिरीचा नैवेद्य

आज रात्री देवाधिदेव महादेवाची पूजा करावी. त्यांना सात्विक खीर अर्पण करा. पूजा केल्यानंतर शंकराला अर्पण केलेली ही खीर घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून द्यावी. यामुळे घरातील वाद, तणाव, आरोग्यविषयक अडचणी कमी होतात आणि घरात शांती व सौख्य नांदते.

Shravan Somwar 2025 Upay
Shukrawar Upay: घरातून नकारात्मकता होईल दूर; शुक्रवारच्या दिवशी करा हे सोपे उपाय

आर्थिक अडचणी दूर करणारा उपाय

ज्यांना आर्थिक संकट भासत आहे त्यांनी आज रात्री महालक्ष्मी देवीची पूजा करावी. देवीसमोर शुद्ध तुपाचा दीप लावा आणि आपल्याकडून झालेल्या चुकांसाठी मन:पूर्वक क्षमा मागा. त्यांनंतर देवीला खिरीचा नैवेद्य दाखवा. असं केल्याने महालक्ष्मीची कृपा मिळते आणि घरात धनवृद्धी घडते.

Shravan Somwar 2025 Upay
Remedies On Sunday: रविवारच्या दिवशी मीठाचे उपाय करणं ठरेल फायदेशीर; करियरमध्ये लाभ होऊन नकारात्मकता दूर होईल

प्रदोष काळातील शिवपार्वती पूजन

आजचा सोमवार विशेष आहे, कारण प्रदोष काल देखील याच दिवशी आहे. प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्ताच्या आधी आणि नंतरचा अडीच तास शिवपार्वतीची एकत्र पूजा केल्यास मनशांती, स्वास्थ्य आणि जीवनातील संकटांचं निवारण होतं. यावेळी शिवलिंगाजवळ तुपाचा दीप लावा आणि

शिव चालीसा वाचा. महामृत्युंजय मंत्राचा कमीत कमी एक वेळ जप करा:

"ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्।

उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात॥"

Q

श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व काय आहे?

A

या महिन्यात देवी पार्वतीने शिवाला पती म्हणून मिळण्यासाठी तप केले, त्यामुळे तो पवित्र आणि भक्तिमय काळ मानला जातो.

Q

श्रावणी सोमवारचे विशेष महत्त्व काय आहे?

A

सोमवार हा शिवाचा दिवस असून श्रावणातील सोमवारला अत्यंत शुभ मानले जाते, विशेषतः पहिला सोमवार.

Q

28 जुलै 2025 रोजी कोणते शुभ योग आहेत?

A

या दिवशी पहिला श्रावणी सोमवार, चतुर्थी तिथी आणि प्रदोष काळ एकत्र आहेत, जे शिवपूजेसाठी अत्यंत फलदायी आहेत.

Q

घरात शांतता आणण्यासाठी कोणता उपाय करावा?

A

रात्री शिवाची पूजा करून सात्विक खिरीचा नैवेद्य अर्पण करा आणि सर्वांना प्रसाद म्हणून द्या.

Q

आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी काय करावे?

A

महालक्ष्मीची पूजा करा, तुपाचा दिवा लावा, चुकीसाठी क्षमा मागा आणि खिरीचा नैवेद्य दाखवा .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com