Remedies On Sunday: रविवारच्या दिवशी मीठाचे उपाय करणं ठरेल फायदेशीर; करियरमध्ये लाभ होऊन नकारात्मकता दूर होईल

Salt Remedies On Sunday For Wealth: ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार, घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. मीठ हे असेच एक प्रभावी आणि सहज उपलब्ध होणारे नैसर्गिक घटक आहे.
Remedies On Sunday
Remedies On Sundaysaam tv
Published On
Summary
  • रविवार हा सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत शुभ दिवस आहे.

  • रविवारी मीठाच्या पाण्याने घर पुसल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

  • बाथरूममध्ये पांढरे मीठ ठेवल्याने घरात शांतता आणि सकारात्मकता येते.

रविवार हा दिवस सूर्यदेवाची पूजा-अर्चा करण्यासाठी अत्यंत शुभ मानण्यात येतो. या दिवशी जर भक्तीभावाने आणि चांगल्या मनाने सूर्यदेवाची उपासना केली तर त्या व्यक्तीला शुभ फळ मिळू शकतात. विशेषतः सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य दिल्यास कीर्ती वाढते, धनलाभ होतो आणि करिअरमध्येही भरभराट होते.

ज्योतिष्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, जर तुमच्या आयुष्यात काही सतत अडथळे येत असतील किंवा असलेल्या समस्या सुटत नसतील तर रविवारच्या दिवशी मीठाचे काही अतिशय सोपे उपाय करणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. असं मानलं जातं यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि तुमचं नशीबही उजळू शकतं. हे उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया

Remedies On Sunday
Surya Shani Yuti: सूर्य-शनीच्या महागोचरमुळे 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन; नशीबाचं टाळ उघडणार, तिजोरी धनधान्याने भरणार

मीठाचं पाणी घरात टाकणं

रविवारी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे मीठाच्या पाण्याने लादी पुसणं. एका बादलीत स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात थोडंसं मीठ मिसळा. हे पाणी वापरून संपूर्ण घरात लादी पुसल्याने नकारात्मक शक्ती नष्ट होतात. याशिवाय घरात सकारात्मकतेचं वातावरण तयार होतं.

बाथरूममध्ये ठेवा पांढरं मीठ

रविवारी एका लहान वाटीत पांढरं मीठ घ्या आणि ते बाथरूमच्या एका कोपऱ्यात ठेवा. दर रविवार या वाटीतलं मीठ बदलत राहा. या उपायामुळे घरात सुख-शांती टिकते, आरोग्य सुधारतं, आर्थिक चिंता कमी होतात आणि घराच्या वातावरणात सकारात्मकता निर्माण होते.

Remedies On Sunday
Diwali 2024 : दिवाळीला दिवे लावताना त्यांच्या खाली ठेवा 'या' गोष्टी; घरात येईल सुख-समृद्धी आणि पैसा

मीठाचं दान

रविवारी मीठ दान करणं अत्यंत शुभ मानण्यात येतं. असं केल्याने कुंडलीतील सूर्य बलवान होतो. त्याचप्रमाणे हा उपाय केल्यामुळे करिअरमध्ये वाढ, मान-सन्मान आणि जीवनात यश प्राप्त होऊ शकतं. यावेळी मंदिरात जाऊन पुजाऱ्याला गूळ, मीठ आणि मसूर डाळ यांचं दान करा. ही तिन्ही वस्तू नसतील तरी केवळ मीठाचं दान जरी केलं तरीही सूर्यदेव प्रसन्न होतात.

Remedies On Sunday
Shukrwar che Upay: शुक्रवारच्या 'या' उपायांनी भाग्याचे दरवाजे उघडतील; घरात सुख-समृद्धी सोबत पैसाही येईल

मीठ विकत घेणं टाळा

रविवारच्या दिवशी मीठ खरेदी करणं अत्यंत अशुभ मानलं जातं. असं केल्याने तुम्ही तुमच्याच घरी संकटं आणि अडचणी आणता. त्यामुळे या दिवशी मीठ विकत घेणं टाळा. याऐवजी सोमवार किंवा शुक्रवारच्या दिवशी मीठ खरेदी करावं, असं शास्त्र सांगतं.

Q

रविवारचा दिवस का शुभ मानला जातो?

A

रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे, त्यामुळे त्याची पूजा आणि उपासना या दिवशी विशेष फळदायी मानली जाते.

Q

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कोणता उपाय आहे?

A

रविवारी मीठ मिसळलेल्या पाण्याने घराच्या लादी पुसाव्यात , यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

Q

बाथरूममध्ये मीठ का ठेवावे?

A

बाथरूममध्ये पांढरे मीठ ठेवल्याने घरात सुख, शांती आणि सकारात्मकता निर्माण होते.

Q

रविवारी कोणते दान फायदेशीर आहे?

A

रविवारी मीठ, गूळ आणि मसूर डाळ यांचे दान केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात आणि करिअरमध्ये यश मिळते.

Q

रविवारी मीठ खरेदी करणे का टाळावे?

A

रविवारी मीठ खरेदी करणे अशुभ मानले जाते , असे केल्याने घरात संकटे येऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com