Shukrwar che Upay: शुक्रवारच्या 'या' उपायांनी भाग्याचे दरवाजे उघडतील; घरात सुख-समृद्धी सोबत पैसाही येईल

Friday remedies for wealth: हिंदू धर्मात प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवतेशी आणि ग्रहाशी संबंधित आहे. शुक्रवार हा देवी लक्ष्मी आणि शुक्र ग्रह जो सौंदर्य, प्रेम, भौतिक सुख आणि समृद्धीचा कारक आहे यांना समर्पित मानला जातो.
Shukrawar che Upay
Shukrawar che Upaysaam tv
Published On
Summary
  • शुक्रवार हा लक्ष्मीदेवीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो.

  • शुक्रवारी लाल रंगाच्या कपड्यात मसूर डाळ बांधून हनुमान मंदिरात दान करावे.

  • लक्ष्मीपूजनासाठी शुद्ध तूप आणि फुलांचा वापर करून दिवा लावल्यास घरात शांती राहते.

शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीच्या पूजनासाठी अत्यंत शुभ मानला जातो. धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस समृद्धी आणि सौख्याचं प्रतीक मानला गेला आहे. त्यामुळे या दिवशी काही विशिष्ट उपाय केल्यास ते आपल्या करिअरपासून आरोग्यापर्यंत सर्वच बाबतीत सकारात्मक परिणाम मिळतात असं मानलं जातं.

ज्योतिष्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे उपाय केल्याने घरात सुख-शांतीही राहते. हे उपाय नेमके कोणते आहे आणि ते कोणी केले पाहिजेत ते पाहूयात.

ऊर्जा वाढवण्यासाठी उपाय

जर तुम्हाला तुमच्यातील उत्साह आणि कार्यक्षमतेला कायम टिकवायचं असेल तर शुक्रवारी लाल रंगाच्या कपड्यात थोडीशी मसूर डाळ बांधून ती जवळच्या हनुमान मंदिरात दान करा. हा उपाय केल्यास तुमच्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनात यश मिळण्याचे दरवाजे उघडतात.

आनंद आणि सुख-शांतीसाठी उपाय

शुक्रवारी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर देवी लक्ष्मीसमोर हात जोडून नमस्कार करा. डाव्या हातात एक सुंदर फूल घ्या आणि ते देवीसमोर अर्पण करा. त्याच फुलावर मातीच्या दिव्यात गायीचं शुद्ध तूप घालून त्यात वात लावा आणि दिवा लावा. हा उपाय घरात आनंद, शांती आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतो.

धनवृद्धीसाठी उपाय

जर तुम्हाला आर्थिक स्थैर्य हवं असेल आणि संपत्ती वाढवायची असेल तर शुक्रवारी एक छोटा मातीचा कलश घ्या आणि त्यात स्वच्छ तांदूळ भरा. त्या तांदळावर एक रुपयाचा नाणं आणि हळदीची गाठी ठेवा. नंतर त्या कलशावर झाकण ठेवा आणि आई लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा पंडिताला तो दान करा.

वैवाहिक जीवनातील तणाव

जर तुमच्या वैवाहिक नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप असेल आणि त्यामुळे संबंधांमध्ये दुरावा आला असेल तर शुक्रवारी एक मूठ मसूर डाळ घ्या आणि ती तुमच्या जोडीदाराच्या हाताने सात वेळा स्पर्श करून घ्या. त्यानंतर ती डाळ स्वच्छ वाहत्या पाण्यात सोडा

चांगल्या आरोग्यासाठी उपाय

शुक्रवारी आई लक्ष्मीला तूप आणि मखाण्यांचा नैवेद्य अर्पण करा. हा उपाय केल्याने केवळ तुमचं आरोग्य सुधारतं असं नाही, तर संपूर्ण कुटुंबातील लोकांचे आरोग्य चांगलं राहतं. त्याचप्रमाणे घरातील वातावरण देखील उत्तम राहतं.

Q

शुक्रवारचा दिवस का शुभ मानला जातो?

A

शुक्रवार हा माता लक्ष्मीच्या पूजनाचा दिवस असल्यामुळे समृद्धी आणि सौख्याचा प्रतीक मानला जातो.

Q

ऊर्जा वाढवण्यासाठी शुक्रवारी कोणता उपाय करावा?

A

लाल कपड्यात मसूर डाळ बांधून हनुमान मंदिरात दान करावे; यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते.

Q

घरात सुख-शांती निर्माण करण्यासाठी काय करावे?

A

स्वच्छतेनंतर लक्ष्मीच्या पुढे फुल आणि तुपाचा दिवा लावून पूजा करावी.

Q

धनवृद्धीसाठी शुक्रवारी कोणता दान उपयुक्त आहे?

A

मातीच्या कलशात तांदूळ, रुपयाचे नाणे आणि हळद घालून गरजूला दान करावे .

Q

वैवाहिक तणाव दूर करण्यासाठी कोणता उपाय आहे?

A

जोडीदाराच्या हाताने स्पर्श केलेली मसूर डाळ वाहत्या पाण्यात सोडावी .

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com