Manasvi Choudhary
भगवान शंकर यांना नीलकंठ या नावाने ओळखतात.
नील म्हणजे निळा आणि कांता म्हणजे कंठ असा त्याचा अर्थ होतो.
यानुसार महादेव शंकराचा कंठ निळा आहे असे लक्षात येते.
महादेव शंकराचा कंठ निळा असण्यामागे देखील मोठा इतिहास आहे.
पौराणिक कथेनुसार, संमुद्रमंथनाच्यावेळी समुद्रातून विष बाहेर पडल्यानंतर संपूर्ण जग नष्ट होणार होते मात्र यावेळी महादेव शंकराने ते विष प्राशन केले.
यावेळी विष संपूर्ण शरीरात पसरू नये म्हणून त्यांनी ते आपल्या कंठातच धरले त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला.
या घटनेमुळे महादेव शंकराना 'नीलकंठ' म्हणून ओळखले जाते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टिव्ही डिजीटल याची पुष्टी करत नाही.