Corona Vaccine: करोना लस घेतल्याने हृदयविकाराचा धोका नाही; आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितली तरुणांच्या मृत्यूची कारणे

Corona Vaccine: कोव्हिड काळानंतर कमी वयात मृत्यू होऊ लागल्याने काही लोक करोना लसला दोष देताना दिसतात.
Corona Vaccination
Corona VaccinationSaam tv
Published On

Pune News:

गेल्या काही वर्षांमध्ये आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक व्यक्तींच्या आयुष्यात बदल झाले आहेत. जीवनशैलीत बदल झाल्याने तरुणांमध्ये रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा सारखे आजार बळावत आहे. या आजारांमुळे तरुणांचे अकाली मृत्यू होत आहे. कोव्हिड काळानंतर कमी वयात मृत्यू होऊ लागल्याने काही लोक करोना लसला दोष देताना दिसतात. मात्र, या सर्व लोकांचे आरोप खोडून काढून पुणे आयएमएचे माजी अध्यक्ष डॅाक्टर अविनाश भोडंवे यांनी भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

आयसीएमआरच्या संशोधनावर पुणे आयएमएचे माजी अध्यक्ष डॅाक्टर अविनाश भोडंवे यांनी तरुणांच्या बदलत्या जीवनशैलीवर भाष्य केलं. हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यूसाठी जीवनशैली जबाबदार आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर हृदयविकाराचा धोका नाही, अशी प्रतिक्रिया पुणे आयएमएचे माजी अध्यक्ष डॅाक्टर अविनाश भोडंवे यानी दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Corona Vaccination
Health Tips : कितीही पाणी प्यायले तरी सतत तहान लागते? असू शकतो गंभीर आजार

तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका का वाढलाय?

बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा आजार वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. तरुणांमधील वाढत्या हृदयविकाराच्या आजाराच्या प्रमाणावर पुणे आयएमएचे माजी अध्यक्ष अविनाश भोडंवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Corona Vaccination
Arranged Marriage करताय? जोडीदार निवडताना या चुका करु नका, पश्चाताप करण्याची वेळ येईल

'सध्या लोकांकडून रस्त्यावर मिळणारे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहेत. रस्त्यावरील पदार्थांमुळे त्यांच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढतं. त्यामुळे तरुणांमध्ये लठ्ठपणाचा आजार वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर तरुणांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारखेही आजार बळावत आहेत. यामुळे तरुणांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहेत. त्यात आयसीएमआरच्या अभ्यासामध्ये असे लक्षात आले की मृत्यूचं कारण हे करोनाची लस नाही. मृत्यूच्या मागे पूर्वीचेच कारणं आहेत, असे भोंडवे यांनी सांगितले आहे.

Corona Vaccination
Heart Attack Reason: तरुणांमध्ये का वाढतंय हार्ट अटॅकचं प्रमाण? ICMR च्या अभ्यासातून चक्रावून टाकणारी माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com