अलीकडच्या काळात हृदयविकाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चालताना, फिरताना, नाचताना तसेच व्यायाम करताना अनेकांना हृदयविकाराचे झटके आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
केवळ वृद्धच नाही तर ३० वर्षांखालील तरुणांनाही हृदयविकाराचा झटका येऊ लागला आहे. त्यामुळे अनेकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. काहींनी हार्ट अटॅकचा झटका येण्याला कोरोना लस कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कोरोना महामारीचा (Corona virus) सामना करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम राबवण्यात आली होती. लहानग्यापासून ते ज्येष्ठ व्यक्तींनी कोरोना लसीचे डोस घेतले होते. यामुळेच तरुणांना हृदयविकाराचे झटके येत आहेत, असा अनेकांचा समज आहे.
मात्र, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) हा दावा खोडून काढला आहे. तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं कारण कोरोनाची लस नाही, असं आयसीएमआरने म्हटलं आहे. वास्तविक, ICMR ने नुकताच एक अभ्यास केला आहे.
यामध्ये, कोरोना लस आणि हार्ट अटॅकमुळे (Heart attack) होणारे मृत्यू यांच्यातील संबंधाबाबत निर्माण झालेल्या प्रश्नावर अनेक उत्तरे शोधली.
आयसीएमआरच्या अभ्यासानुसार, तरुणांना हृदयविकाराचा झटका येण्याचं मुख्य कारण व्यसन आहे. अलीकडच्या काळात अनेक तरुणांना कुठलं ना कुठलं व्यसन जडलं आहे. दारू पिणे, सिगारेट ओढणे, तंबाखू तसेच गुटख्याचे सेवन केल्याने तरुणांना हृदयविकाराचे झटके येत आहेत.
याशिवाय हार्ट अटॅक येण्याचं प्रमुख कारण बदलती जीवनशैली आणि लठ्ठपणा देखील आहे. लठ्ठ व्यक्तींमध्ये दृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो. कारण लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. त्यातून हृदयविकार जडू शकतो.
दुसरीकडे अतिआवाजामुळे माणसाला हार्ट अटॅकचा धोका संभावतो. म्हणून डीजेच्या तालावर नाचताना हार्ट अटॅक येण्याच्या घटना घडतात, असं आयसीएमआरच्या अभ्यासातून समोर आलं आहे. आयसीएमआरच्या अभ्यासात देशातील एकूण 47 रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता.
यामध्ये 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे, या तरुणांना कोणताही दुर्मिळ आजार नव्हता. तसेच ज्या तरुणांनी कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्या आहेत, अशा तरुणांना मृत्युचा जास्त धोका नव्हता. ज्यांनी कोरोनाची लस घेतली नाही, अशा व्यक्तींना मृत्यूचा धोका अधिक होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.