Yashwant Verma : न्यायाधीश यशवंत वर्मांचा पाय खोलात, घरात नोटांचा ढीग; मुख्य न्यायाधीशांकडून चौकशी

Justice Yashwant Verma Case : दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात 4 ते 5 पोती जळालेल्या नोटा आढळल्यात..सुप्रीम कोर्टानं नोटांचा व्हिडीओ जारी केलाय. यशवंत वर्मांच्या घराला आग लागली होती.
 Judge Yashwant Verma
Judge Yashwant VermaSaam Tv News
Published On

नवी दिल्ली : दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात 4 ते 5 पोती जळालेल्या नोटा आढळल्यात..आता मात्र सुप्रीम कोर्टानंच आपल्या वेबसाईटवर नोटांचा व्हिडीओ अपलोड केलाय. त्यामुळे वर्मांचा पाय खोलात जाणार का ? पाहूया.

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातून कोट्यावधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना सापडलेल्या नोटांच्या चौकशीसाठी तीन न्यायमूर्तींची समिती स्थापन केलीये. तर सुप्रीम कोर्टानं नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम रहावा म्हणून या प्रकरणातील सर्व कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत. सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलंय.

 Judge Yashwant Verma
Mumbai Fire : भल्या पहाटे विद्याविहारमध्ये आगीचं तांडव, एकाचा होरपळून मृत्यू, एकजण गंभीर

रिपोर्टमधील प्रमुख मुद्दे

न्या. वर्मांच्या निवासस्थानी जळालेल्या नोटा सापडल्या

दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांकडून चौकशी होणार

न्या. वर्मांचं गेल्या 6 महिन्यांचं कॉल रेकॉर्ड तपासणार

दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात 4 ते 5 पोती जळालेल्या नोटा आढळल्यात..सुप्रीम कोर्टानं नोटांचा व्हिडीओ जारी केलाय. यशवंत वर्मांच्या घराला आग लागली होती. या आगीत त्यांच्या घरात जळालेल्या नोटा सापडल्याची चर्चा होती. मात्र अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी नोटा सापडल्या नसल्याचा खुलासा केला होता. आता मात्र सुप्रीम कोर्टानंच आपल्या वेबसाईटवर नोटांचा व्हिडीओ अपलोड केलाय. दरम्यान यशवंत वर्मांची अलाहबाद कोर्टात बदली करण्यात आलीय. शिवाय याप्रकरणी चौकशी सुरु करण्यात आलीये. दरम्यान या प्रकरणी यशवंत वर्मा यांनी स्पष्टीकरण दिलंय. पाहुयात वर्मांनी काय म्हटलंय.

 Judge Yashwant Verma
Ajit Pawar On Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या 'त्या' टीकेवर अजित पवारांचं प्रत्युत्तर, नेमकं प्रकरण काय?

न्यायमूर्ती वर्मांचं स्पष्टीकरण

1) मी किंवा कुटुंबातील कुणीही स्टोअर रूममध्ये रोख रक्कम ठेवली नाही

2)अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी रोख रक्कम आढळली नाही

3) जळालेली रोकड कुणालाही दाखवली नाही

4)मला फसवण्याचे आणि बदनाम करण्याचे षडयंत्र

5)या प्रकरणी कसून चौकशी करावी

न्यायमुर्ती यशवंत वर्मांच्या राजीनाम्याची मागणी अलाहाबाद हायकोर्टाच्या बार असोसिएशनने केलीये. दरम्यान यापूर्वीही 2018 मध्ये, सीबीआयने गाझियाबादच्या सिंभोली साखर कारखान्यातील अनियमिततेप्रकरणी न्यायमूर्ती वर्मांच्या विरोधात एफआयआर नोंदवला होता. त्यामुळे याप्रकरणी आता काय कारवाई होते हेच पाहायचं.

 Judge Yashwant Verma
Satara Crime: आईच्या मदतीने तरुणीने बॉयफ्रेंडला संपवलं, हत्या करून अपघाताचा बनाव; साताऱ्यात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com