Hina Khan Breast Cancer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hina Khan Breast Cancer : अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान, पोस्ट करत स्वत:च चाहत्यांना दिली हेल्थ अपडेट

Hina Khan News : अभिनेत्री हिना खान हिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. अभिनेत्रीचा कॅन्सर तिसऱ्या टप्प्यातील असून गेल्या अनेक दिवसांपासून ती या आजाराशी झुंज देत आहे.

Chetan Bodke

टीव्ही अभिनेत्री हिना खानविषयी धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री हिना खान हिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. अभिनेत्रीचा कॅन्सर तिसऱ्या टप्प्यातील असून गेल्या अनेक दिवसांपासून ती या आजाराशी झुंज देत आहे. अभिनेत्रीने इन्स्टग्रामवर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने तिच्यावर उपचार सुरू झाल्याची माहिती दिली आहे. सर्वांच्या प्रेमाबद्दल तो आभारी आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये हिना खान म्हणाली, "गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर माझ्याबद्दल काही अफवा पसरल्या आहेत. जे नेहमीच माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्या चाहत्यांना एक गोष्ट सांगायची आहे. मला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. हा कॅन्सर तिसऱ्या टप्प्यातील आहे. मी सध्या अगदी व्यवस्थित आहे. या आजाराशी लढण्यासाठी मी पूर्णपणे स्ट्राँग आहे. मी नक्की या आजारातून बरी होईल. सध्या माझ्यावर कॅन्सर संबंधित उपचार सुरू असून यातून बरी होण्यासाठी मी सगळं काही करायला तयार आहे. "

अभिनेत्रीने पुढे पोस्टमध्ये लिहिलंय की, " मी माझ्या चाहत्यांकडे यावेळी प्रायव्हेसीची मागणी करीत आहे. तुमचं प्रेम, प्रार्थना आणि ताकदीची मला पूर्णपणे जाणीव आहे. या प्रवासातून जाताना मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. मी माझ्या फॅमिलीसोबत पॉझिटिव्ह आहे. यातून मी पूर्णपणे बरी होईल, याचा मला विश्वास आहे. तुमच्या प्रार्थना, प्रेम आणि आशीर्वादांची मला गरज आहे. " हिनाची ही पोस्ट पाहून अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यासोबतच अभिनेत्रीला लवकरच बरी हो अशी प्रतिक्रियाही केली आहे.

हिना खान हिला "ये रिश्ता क्या कहलाता" मालिकेतून विशेष ओळख मिळाली आहे. या शोमध्ये तिने सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारली. तिच्या कॅरेक्टरचं नाव अक्षरा असं आहे. त्यानंतर हिना "बिग बॉस 11" मध्येही दिसली होती. बिग बॉसमुळेही तिला विशेष लोकप्रियता मिळाली. टेलिव्हिजन शो व्यतिरिक्त, तिने वेब शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिना खानने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agriculture Crisis: राजकारणानं घेतला शेतकऱ्याचा बळी? तहसील कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या

IPS अधिकाऱ्यानं घरातच आयुष्य संपवलं, IAS पत्नीकडून गंभीर आरोप, संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

Maharashtra Live News Update: आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची हत्या

Fact Check: बाजारात ५५० रूपयांचं कॉईन? १०० आणि ७५ रुपयांचंही कॉईन येणार?

Accident: मुंबईत अपघाताचा थरार! हायवेवर रेस लावणं पडलं महागात, महागड्या पोर्शे कारचा चुराडा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT