Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सर पुन्हा उद्धभवण्याचा धोका, अॅडव्हान्स उपचार पद्धतीने भीती करता येणार दूर

Metastasis Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रथम निदानानंतर १० वर्षांच्या आत तो परतण्याची शक्यता ३० टक्‍के ते ६० टक्क्‍यांपर्यंत असते.
Breast Cancer
Breast CancerSaam Tv
Published On

Breast Cancer Reason :

ब्रेस्ट कॅन्सरचे निदान हा आयुष्य बदलून टाकणारा क्षण असतो, पण त्याहूनही अधिक भीतीदायक असते ती कॅन्सर पुन्हा उद्भवण्याची भीती. संशोधनातून हाती आलेल्या आकडेवारीनुसार ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रथम निदानानंतर १० वर्षांच्या आत तो परतण्याची शक्यता ३० टक्‍के ते ६० टक्क्‍यांपर्यंत असते.

भारतामधील एक काळजीची बाब म्हणजे इथे रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध होईपर्यंत खूप उशीर होऊन जातो व परिणामी ६० टक्‍क्‍यांहून अधिक वेळा ब्रेस्ट कॅन्सरचे निदान आजार गंभीर टप्प्यावर, सर्वसाधारणपणे दुसऱ्या वा तिसऱ्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर होते.

डॉ. अजय गोगाई, AIIMS दिल्ली यांनी म्हटले की, ही बाब चिंतेची आहे कारण ब्रेस्ट कॅन्सरचे प्रथम निदान कोणत्या टप्प्यावर झाले याचा कॅन्सर (Cancer) परतण्याच्या किंवा मेटास्टॅटिस (Metastasis)च्या शक्यतेवर प्रभाव पडू शकतो. उदाहरणार्थ तिसऱ्या टप्प्यामध्ये (Stage III) ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झालेल्या व्यक्तींना तो पुन्हा होण्याचा धोका पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात (Stage I - II) निदान झालेल्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक असतो. ब्रेस्ट कॅन्सरमधून वाचलेल्या व्यक्तींची संख्या गेल्या काही वर्षांत लक्षणीयरित्या वाढली आहे हे खरे असले तरीही तो पुन्हा उद्भवण्याची आणि मेटास्टॅसिसनंतरच्या आयुष्याबद्दलच्या भीतीची टांगती तलवार अनेकांच्या डोक्यांवर अजूनही आहे.

1. कॅन्सर मेटॅस्टटाइझ म्हणजे काय?

चौथ्या टप्प्यावरील (Stage IV) कॅन्सर म्हणून ओळखला जाणारा मेटॅस्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर (mBC) हा कॅन्सरची स्तन आणि आसपासच्या लसिकांच्या (lymph nodes) क्षेत्राबाहेर झालेली व फुफ्फुसे, यकृत किंवा मेंदूपर्यंत झालेली वाढ दर्शवितो. यामध्ये प्रत्येक व्यक्तीची स्थिती ही वेगळी असते. सध्या उपलब्ध असलेल्या उपचारांची (Treatment) रचना ही केवळ रुग्णांचे प्राण वाचविण्याच्या दृष्टीनेच नव्हे तर या आव्हानात्मक प्रवासातील समस्यांचा सामना करणाऱ्या व्यक्तींचा जीवनमानाचा दर्जा जपण्यासाठीही करण्यात आली आहे.

Breast Cancer
Liver Health Tips : सणासुदीच्या काळात गोड आणि तेलाचे पदार्थांमुळे यकृत धोक्यात? जाणून घ्या डॉक्टरांकडून

2. mBC सोबतचे आयुष्य आणि उपचारांचे पर्याय

मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरशी संबंधित एक गैरसमज सर्वत्र दिसतो आहे आणि निदानानंतर रुग्णाकडे जगण्यासाठी केवळ काही महिने उरतात या समजुतीभोवती ही भ्रामक कल्पना फिरताना दिसते. हा दृष्टीकोन समजण्यासारखा आहे, पण तो संपूर्ण चित्र दाखवित नाही. प्रगत उपचारपद्धती यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात ही बाब इथे विचारात घेणे महत्त्वाचे आहे. या उपचारपद्धतीमध्ये कॅन्सरची वाढ थोपविण्याची आणि त्याच्याशी संबंधित अनेक लक्षणे दूर करण्याची शक्यता आहे. विशिष्ट प्रकारचा मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर असलेल्या व्यक्ती, अगदी कॅन्सर स्तनांबाहेर पोहोचल्यानंतरही अनेक वर्षांपर्यंत जगणे पूर्णपणे शक्य आहे.

परतलेल्या ब्रेस्ट कॅन्सरशी सामना करणे हे काम हाताळायला अधिक कठीण असू शकते, पण त्याचा अर्थ ही परिस्थिती पहिल्या वेळेपेक्षा वाईटच असणार असा त्याचा अर्थ होत नाही. आपल्या मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरविषयी आपल्या डॉक्टरांशी (Doctor) तपशीलवार आणि खुला संवाद साधणे ही अंत्यत महत्त्वाची गोष्ट आहे. या चर्चांमुळे तुमचे स्वत:चे विशिष्ट निदान समजून घेण्यासाठी एक पाया तयार होतो व त्यातून तुम्हाला तुमच्या उपचारांच्या योजनेविषयीची माहिती मिळते. उपचारांच्या पर्यायांच्या सदा उत्क्रांत होत असलेल्या जगाविषयीची माहिती मिळवित राहणे हे रुग्णांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

Breast Cancer
Diabetes In Children: चिमुकल्यांमध्ये ही लक्षणे दिसल्यास असू शकतो मधुमेहाचा आजार, दुर्लक्ष करु नका; वेळीच घ्या काळजी

उदाहरणार्थ संशोधनातून असे दिसून आले आहे की, जेव्हा प्रगत उपचारपद्धती पारंपरिक हार्मोनल उपचारांच्या सोबतीने वापरली जाते तेव्हा ती कॅन्सरशी खूपच प्रभावीपणे लढा देऊ शकते. तुमच्या डॉक्टरांना तुमच्या स्थितीची संपूर्ण आणि सखोल माहिती असेल तरच ते खास तुमच्या स्थितीनुसार तुमच्या उपचारांची आखणी करू शकतात, ज्यात तुमच्या व्यक्तिगत गरजा आणि प्राधान्यक्रम यांना विचारात घेतले जाईल.

त्याचबरोबर उपचारांच्या नियोजनाची निवड करताना रुग्णांनी आपल्या जीवनमानाचा दर्जा वाढवतील आणि आयुर्मान लांबवतील अशा प्रकारच्या जगण्याच्या पद्धतींना प्राधान्य दिले पाहिजे. यात सकस आहार, नियमित व्यायाम, ताणतणावांचे प्रभावी व्यवस्थापन आणि पुरेसा आराम घेणे या गोष्टींचा समावेश होतो. या सर्व गोष्टी तुमच्या व्यक्तिगत उपचार पद्धतीशी सुसंगत असल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला, मित्रमंडळींना आणि आरोग्यकर्मींनी सामावून घेणारी प्रभावी आधार यंत्रणा प्रस्थापित करणे हे या प्रवासात अत्यंत महत्त्वाचे आहे.

Breast Cancer
Sun Tanning Skin : ऑक्टोबर हिटमुळे त्वचेवर होतोय परिणाम? कशी घ्याल काळजी

मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरचे निदान होणे ही भीतीदायक गोष्ट असू शकते. तंत्रज्ञान आणि वैद्यकीय ज्ञान सातत्याने प्रगती साधत आहे व त्यासोबतच मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि उपचारांमध्येही सातत्याने सुधारणा होत राहणार आहेत त्यातून या भयंकर निदानाचा सामना करणाऱ्या रुग्णांना नवी आशा मिळेल व त्यांच्या आयुष्यात अधिक वर्षे जोडली जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com