Liver Health Tips : सणासुदीच्या काळात गोड आणि तेलाचे पदार्थांमुळे यकृत धोक्यात? जाणून घ्या डॉक्टरांकडून

How Sweet And Oily Foods Affected On Liver : सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतो तो फॅटी लिव्हरचा आजार. पण हा आजार कसा होतो? याची कारणे काय?
Liver Health Tips
Liver Health TipsSaam Tv

What Is Fatty Liver:

शरीरातील अंत्यत महत्त्वाचा भाग लिव्हर आहे. फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे हल्ली बहुतेक लोक त्रस्त आहेत. यकृत हे हृदय, मेंदू, किडनी या अवयवांसारखे महत्त्वाचे असते. त्याशिवाय आपण जगू शकत नाही.

परंतु, बदलेल्या जीवनशैलीमुळे यकृताचा आजार होण्याची अनेक कारणे समोर आली आहेत. यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतो तो फॅटी लिव्हरचा आजार. पण हा आजार कसा होतो? याची कारणे काय? जाणून घेऊया.

पिंपरी पुण्यातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि हेपॅटोलॉजिस्ट, डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर अमोल डहाळे म्हणतात की, शरीरातील अतिरिक्त चरबी ही लिव्हरमधून कार्यान्वयीत होते. तर फक्त पाच टक्के चरबी ही यकृतमध्ये साठवून ठेवली जाते. यापेक्षा अधिक प्रमाणात चरबी लिव्हरमध्ये साठल्यास त्याला फॅटी लिव्हर असे म्हटले जाते. त्यामुळे त्याचा दुष्परिणाम यकृतावर होतो.

लिव्हरवर (Liver) दुष्परिणाम झाल्यास इंफ्लेमेशन (स्टिएटोहेपाटायटिस), नंतर फायब्रोसिस सारख्या समस्या जडून डॅमेज म्हणजेच सिऱ्होसिस होऊ शकते. यामुळे खाण्यापिण्याकडे पुरेसे लक्ष द्यायला हवे.

Liver Health Tips
Diabetes In Children: चिमुकल्यांमध्ये ही लक्षणे दिसल्यास असू शकतो मधुमेहाचा आजार, दुर्लक्ष करु नका; वेळीच घ्या काळजी

सध्या सणासुदीचे (Festival) दिवस सुरु आहेत या काळात आपण अधिक प्रमाणात गोडाचे आणि तेलाचे पदार्थ खातो. परंतु, याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. दसरा दिवाळीच्या काळात चमचमीत तेलाच्या पदार्थांवर ताव मारून खाणारे कमी नाहीत. अशावेळी आपल्याला जिभेचे चोचले पुरवताना आरोग्याची (Health) काळजी देखील घ्यायला हवी.

अधिक प्रमाणात गोडाचे तेलाचे पदार्थ खाल्ल्याने फॅटी लिव्हरचा आजार होतो. यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरी युक्त पदार्थ खाल्ल्यामुळे होते. माणसाच्या शरीरात सर्व प्रकारच्या कॅलरी या फॅटमध्ये रुपांतर करतात. ज्यामुळे लिव्हरवर त्याचा परिणाम होतो. यकृत हा शरीरातील सर्वात संरक्षक अवयव आहे. त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी 'यकृत सदृढ, तर तुम्ही सदृढ.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com