Sun Tanning Skin : ऑक्टोबर हिटमुळे त्वचेवर होतोय परिणाम? कशी घ्याल काळजी

October Heat Affect Skin : तुम्हाला देखील टॅनिंगच्या समस्या जाणवत असतील तर चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची हे पाहूया
Sun Tanning Skin
Sun Tanning SkinSaam Tv
Published On

Skin Care Tips :

ऑक्टोबर महिना सुरु झाला की, थोड्या प्रमाणात उकाडा जाणवू लागतो. कामासाठी किंवा काही कारणानिमित्त घराबाहेर पडताना आपल्याला चेहऱ्याची काळजी घ्यावी लागते.

पाहायला गेले तर सूर्यप्रकाशाची किरणे आरोग्यासाठी चांगले असतात. त्यातून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळते. परंतु अतिनील किरणांमुळे आपल्याला टॅनिंगच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्वचेचा रंग देखील खराब होतो. जर तुम्हाला देखील टॅनिंगच्या समस्या जाणवत असतील तर चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची हे पाहूया

1. सनस्क्रीन

टॅनिंग (Tanning) टाळण्यासाठी सनस्क्रीन सर्वात फायदेशीर ठरते. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे (Skin) रक्षण करण्यासाठी सगळ्यात प्रभावी मानले जाते. सूर्याच्या हानिकारक किरणांचा त्वचेचवर परिणाम झाल्यास त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे घरातून बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावा.

2. सूर्यप्रकाशात जाणे टाळा

जास्त वेळ उन्हात फिरल्याने त्वचा टॅन होते. त्यामुळे गरज असल्यास घरातून बाहेर पडा. यासोबत पूर्ण कपडे, टोपी, स्कार्फ इत्यादींचा वापर करा. तसेच उन्हाच फिरताना त्वचेची विशेष काळजी घ्या.

Sun Tanning Skin
Egg Benefits For Hair : केसातील कोंड्यापासून त्रस्त आहात? सतत केस कडक होतात, हा हेअर मास्क ठरेल फायदेशीर

3. होममेड पॅक

तुमची त्वचा टॅन झाली असेल तर स्वयंपाकघरातील काही पदार्थ तुम्हाला मदत करतील. यासाठी दही आणि टोमॅटोचा पॅक उपयोगी ठरेल. टोमॅटो टॅनिंग हलके करण्यास मदत करते तर दही त्वचेला एक्सफोलिएट करते. याशिवाय बदाम (Almond) तेल आणि चंदन पावडर एकत्र करुन पॅक तयार करा.

4. कोरफड जेल

सनबर्न किंवा त्वचा टॅनिंग झाल्यास कोरफड जेल उपयोगी ठरेल. यामुळे त्वचा मॉइश्चरायझ करता येते. त्वचेवर असणारे टॅन कमी करता येते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com