Aishwarya Narkar Video : व्हिडिओ शेअर करत ऐश्वर्या नारकर यांनी सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाल्या, "कारमध्ये मांजरीची पिल्लं सापडली अन्..."

Aishwarya Narkar News : ऐश्वर्या नारकर यांच्या कारच्या बोनेटमध्ये तीन मांजरीची पिल्लं सापडली आहेत, त्यामुळे त्यांनी नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे.
Aishwarya Narkar Video : व्हिडिओ शेअर करत ऐश्वर्या नारकर यांनी सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाल्या, "कारमध्ये मांजरीची पिल्लं सापडली अन्..."
Aishwarya Narkar VideoSaam Tv

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धी मिळवली आहे. ऐश्वर्या कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्या कायमच इन्स्टाग्रामवर योगा आणि रिलमुळे चर्चेत असतात. त्यासोबतच त्यांच्या फॅशनचीही इन्स्टाग्रामवर चांगलीच चर्चा होत असते. सध्या ऐश्वर्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आल्या आहे. त्यांनी व्हिडिओ शेअर करत पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. ऐश्वर्या यांच्या कारच्या बोनेटमध्ये तीन मांजरीची पिल्लं सापडली आहेत, त्यामुळे त्यांनी नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे.

Aishwarya Narkar Video : व्हिडिओ शेअर करत ऐश्वर्या नारकर यांनी सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाल्या, "कारमध्ये मांजरीची पिल्लं सापडली अन्..."
Gaurav More News : गौरव मोरेने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट, भेटीचं नेमकं कारण काय ?

काल ऐश्वर्या नारकर यांनी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. व्हिडिओमध्ये ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, "काल जरा एक गोंधळ झाला म्हणून आवर्जून हा व्हिडीओ करतेय. काल माझी गाडी सर्व्हिसिंगसाठी गेली होती. एक-दोन तासांनी मला कारच्या सर्व्हिस सेंटरमधून फोन आला की, तुमच्या आजूबाजूला काही मांजरं आहेत का? तर मी म्हटलं हो; खूप आहेत का काय झालं? तुमच्या कारमध्ये मांजरीची तीन छोटी बाळं सापडली आहेत. असं त्यांनी मला सांगितलं."

पुढे व्हिडिओमध्ये ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, "ते ऐकून माझ्या पोटात अक्षरश: गोळा आला. कारण- आदल्याच दिवशी आमच्या बिल्डिंगमध्ये एका मांजरीनं तीन पिल्लांना जन्म दिला होता. पावसापाण्याचे दिवस असल्यानं ती पिल्लं सुरक्षित राहावीत म्हणून आम्ही त्या पिल्लांना एका बॉक्समध्ये ठेवलं होतं. पण, ती मांजर कधी तिच्या बाळांना माझ्या गाडीत घेऊन गेली कधी आणि तिनं तिच्या बाळांना माझ्या गाडीत ठेवलं, हे कळलंसुद्धा नाही. गाडी १४-१५ किलोमीटर चालली तरीसुद्धा ही बाळं सुरक्षित होती. ही अक्षरश: देवाची कृपा आहे"

Aishwarya Narkar Video : व्हिडिओ शेअर करत ऐश्वर्या नारकर यांनी सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाल्या, "कारमध्ये मांजरीची पिल्लं सापडली अन्..."
Mirzapur Season 3: 'मिर्झापूरने आम्हाला स्टार बनवलं, नाहीतर आम्ही फक्त...'; पंकज त्रिपाठींनी सांगितली 'मन की बात'

"मग त्या सर्व्हिसिंगच्या माणसांनी त्या मांजराच्या पिल्लांना सोडवलं आणि त्यांच्या आईला भेटवलं. आता ते मांजरीची पिल्लंही आणि त्यांची आईही सेफ आहे. पण यावरून मला अगदीच आवर्जून सांगायचंय. पावसापाण्याचे दिवस आहेत. जर तुमच्या आजूबाजूला मांजरं असतील. जर कुठल्या मांजरीनं पिल्लं दिली असतील, तर कृपया गाडी सुरू करण्याआधी बोनेट उघडून त्याच्यात टॉर्च मारून पिल्लं आहेत का बघा. गाडीच्या खालीसुद्धा बघा. कारण- आपल्याला कळत नाही आणि या बाळांचा उगाचच जीव जाऊ शकतो. म्हणून कृपया करून एवढी काळजी घ्या. धन्यवाद", असं ऐश्वर्या नारकर व्हिडिओमध्ये म्हणाल्या. अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर करताना “कृपया, कार सुरू करण्यापूर्वी तुमच्या कारचे बोनेट तपासा”, असं कॅप्शन दिले आहे.

Aishwarya Narkar Video : व्हिडिओ शेअर करत ऐश्वर्या नारकर यांनी सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाल्या, "कारमध्ये मांजरीची पिल्लं सापडली अन्..."
Kalki 2898 AD चा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका; कलेक्शन किती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com