Bad News Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bad News Film : 'एका बाळाचे २ बाप', विकी कौशल, तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज'चा तुफान कॉमेडी ट्रेलर रिलीज; एकदा पाहाचं

Bad News Film Trailer Out : संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'ॲनिमल' चित्रपटानंतर अभिनेत्री तृप्ती डिमरी नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बॅड न्यूज' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे.

Chetan Bodke

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'ॲनिमल' चित्रपटानंतर अभिनेत्री तृप्ती डिमरी नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तृप्ती डिमरीच्या आगामी चित्रपटाचं नाव 'बॅड न्यूज' असं आहे. तृप्ती डिमरी, विक्की कौशल आणि एमी विर्क स्टारर रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झालेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर रिलीज झाला होता. आता अखेर ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा होत आहे.

चित्रपटाचा ट्रेलर विकी कौशलने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केलेला आहे. ट्रेलरमध्ये तुम्हाला, तृप्ती डिमरीचं विक्की कौशल आणि एमी विर्क या दोघांसोबत प्रेमसंबंध असतात. तृप्ती डिमरी चित्रपटामध्ये गरोदर दाखवली आहे. पण तिचे विकी आणि एमी दोघांसोबतही रिलेशन असल्यामुळे जन्मला येणाऱ्या बाळाचे नेमके वडील कोण यावरुन दोघांमध्ये वाद होताना पाहायला मिळत आहे. मजेशीर कथानक असलेला चित्रपट पाहिल्यावरच आपल्याला नेमके बाळाचे वडील कोण ? या प्रश्नाचे उत्तर कळेल.

चित्रपटाचे कथानक प्रेग्नेंसी आणि फादरहूडवर आधारित आहे. प्रमुख भूमिकेत तृप्ती डिमरी, विक्की कौशल, एमी विर्क, आणि नेहा धूपियाही आहे. नेहमीच गंभीर पात्र साकारणाऱ्या विकी कौशलने चित्रपटात विनोदी पात्र साकारले आहे. त्याच्या अभिनयाचे सध्या प्रेक्षकांकडून जोरदार कौतुक होत आहे. चित्रपटातील विक्कीचे डायलॉग्स प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसत आहे. या ट्रेलरवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत असून अनेकांनी विक्कीच्या कॉमेडीचं कौतुक केलं आहे.

'बॅड न्यूज' चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने केली असून आनंद तिवारी यांनी दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट १९ जुलै २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. २०१९ मध्ये आलेल्या 'गुड न्यूज' चित्रपटाची ही फ्रेंचाईजी आहे. २०१९ मध्ये आलेल्या 'गुड न्यूज'मध्ये प्रमुख भूमिकेत करीना कपूर, कियारा आडवाणी, अक्षय कुमार, दिलजीत दोसांझ होते. 'गुड न्यूज' चित्रपटाला प्रेक्षकांकडून थिएटरमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता 'गुड न्यूज'प्रमाणेच 'बॅड न्यूज' चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT