Best Movie
Best Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Best Movies: बॉलिवूडवर टॉलिवूडभारी, 'हे' पाच दाक्षिणात्य हिट चित्रपट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Best Movies: वैश्विक कोरोना महामारीनंतर २०२२ हे वर्ष सर्वांसाठीच जितके दिलासादायक, तितकेच मोठी शिकवण देणारे होते. २०२२ हे वर्ष प्रामुख्याने मनोरंजनसृष्टीसाठी फार महत्वाचे होते. बॉलिवूडमधील बरेच चित्रपट बॉयकॉट ट्रेंडमुळे जबरदस्त अडचणीत सापडले होते. दाक्षिणात्य चित्रपटांनी बऱ्याच चित्रपटांना धुळ चारत आपले स्थान पक्के करत आहे. सध्या दाक्षिणात्य चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे कांतारा.

कांतारा चित्रपटाची सोशल मीडियावर अजूनही चर्चा कायम आहे. या चित्रपटाने अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टी हा चांगलाच चर्चेत आला आहे. एका रात्रीतच या चित्रपटाने रिषभच्या आयुष्याला कलाटणीच दिली. एकूणच यावर्षी दाक्षिणात्य चित्रपटांनी हिंदी चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर दिली आहे. बॉलिवूडमधील बरेच चित्रपट कथेमुळे आणि आशयामुळे बॉक्स ऑफिसवर मुसंडी मारत आहेत.

ही बाब खरंतर बॉलिवूडसाठी फारच गंभीर आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सहा चित्रपटांपैकी पाच चित्रपट हे दाक्षिणात्य चित्रपटच आहेत. एका बाजूला ही बाब दाक्षिणात्य चित्रपटांसाठी आनंदाची बाब असून बॉलिवूडसाठी चिंतेची बाब आहे. यापूर्वी अनेक बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक व इंडस्ट्रीतील मुख्य चेहऱ्यांनी चित्रपट दर्जेदार आशयाचे असावे असे आपले स्पष्ट मत व्यक्त केले होते.

बॉलिवूडमधील काही चित्रपटांना व्हिएफएक्सने चांगलाच फटका बसला आहे, असे चित्र सध्या नेटकऱ्यांच्या ट्रोलधाडीवरुन दिसत आहे. सोबतच यामुळे हिंदी चित्रपटसृष्टी प्रेक्षकांमुळे दूर जात असल्याची खंत आता प्रेक्षकांना कुठे तरी वाटत आहे. बॉलिवूडमध्ये द काश्मिर फाईल्स, भूलभूल्लैया २, ब्रम्हास्त्र हे चित्रपट वगळता बऱ्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर सपाटून मार खाल्ला आहे.

यावर्षी एकूण बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांनी आपले यश संपादन केले असून ‘केजीएफ चॅप्टर २’ आणि ‘आरआरआर’ हे दोन चित्रपट जगभरात सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट ठरले होते.

‘केजीएफ २’ ने जगभरात १२३५.२ कोटी तर ‘आरआरआर’ने जगभरात ११३५.८ कोटी इतकी कमाई केली आहे. मणिरत्नम यांच्या ‘पीएस १’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर ५०० कोटीची कमाई केली आहे.

कमल हासन यांचा ‘विक्रम’ आणि रणबीर कपूर आलिया भट्टच्या बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांनीही दमदार कमाई केली आहे. ‘विक्रम’ या चित्रपटाने ४२४.४ कोटी तर ‘ब्रह्मास्त्र’ने जगभरात ४३० कोटींची कमाई केली आहे.

रिषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा’ने ४०० कोटींचा आकडा गाठला असून, कन्नड भाषेत ‘केजीएफ २’ या चित्रपटाने मागे टाकले. अगदी कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात जबरदस्त कमाई करत प्रेक्षकांना चित्रपटाशी बांधून ठेवले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: PM मोदींची उद्या पुण्यात सभा; भाजपकडून जोरदार तयारी सुरू

Buldhana Accident: अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाला ट्रकची जोरदार धडक; ६ जणांची प्रकृती गंभीर

Kitchen Tips: साबण आठवड्यातच संपतो ?; फॉलो करा 'या' टीप्स

MI Playoffs Scenario: मुंबई इंडियन्सला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! कसं असेल समीकरण?

Madha Lok Sabha: माढ्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार? बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT