
Bigg Boss Marathi 4 Latest Update: बिग बॉस मराठीचे घर आज ५० दिवस पूर्ण करत आहे. बिग बॉस मराठीचे स्पर्धक गेल्या दिड महिन्यापासून एकत्र राहत घरात वावरत आहे. जरी सर्व स्पर्धक इतके दिवस एकत्र राहत असले तरी त्यांच्यातील वाद अजूनही होतच आहे. त्यांच्यातील अजूनही वाद चांगलाच रंगतो. आत्तापर्यंत घरातून सहा सदस्य बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता या आठवड्यातील सातवा स्पर्धक कोण बाहेर जाणार याची प्रत्येकाला उत्सुकता लागून राहिली आहे.
त्याआधी बिग बॉस मराठीच्या घरात एक मोठा ट्विस्ट आला आहे. गेल्या आठवड्यात दोन स्पर्धक बाहेर पडले होते. त्यातील दुसरा स्पर्धक किरण माने. किरणला बिग बॉसने सिक्रेट पॉवर दिली आहे, त्यातून त्याला घरातील सदस्यांवर नजर ठेवायचे आहे. त्याच्या पश्चात त्या बद्दल कोण काय बोलते आहे, यावर विशेष लक्ष ठेवायचे आहे. नुकताच आजच्या भागाचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
त्या शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत किरण सर्व स्पर्धकांवर सिक्रेट रुममध्ये बसून नजर ठेवताना दिसत आहे. प्रसाद तेजस्विनीचा ग्रुप बोलत आहे. दुसरीकडे किरण म्हणतोय की, विकास अत्यंत स्वार्थीपणा करतोय विकास. तेजस्विनी आणि अमृता किती काळजी करत आहे, त्याची तो या ग्रुपकडे डोकवूनही पाहत नाही. त्यामुळे आता विकास आणि किरण मानेंच्या मैत्रीत मोठी दरी पडल्याचे दिसून येत आहे. आजच्या भागात स्पर्धकांमध्ये कॅप्टन्सीचे स्पेशल टास्कही दिसणार आहे.
आजच्या भागात स्पर्धकांना कॅप्टन्सी मिळवण्यासाठी स्पेशल टास्क दिले आहे. टीमला कॅप्टन पदाचा अधिकार मिळण्यासाठी दोन्ही टीममध्ये 'काटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे. हे कार्य असे आहे की, 'जी टीम घरातील हत्तीच्या गळ्यात जास्तीत जास्त हार घालेल त्या टीमला कॅप्टन पद मिळेल.' आता त्या हत्तीच्या गळ्यात हार घालण्यासाठी स्पर्धक एकमेकांमध्ये भिडले आहेत. एका टीममध्ये अपूर्वा आणि अक्षय तर दुसऱ्या टीममध्ये प्रसाद आणि तेजस्विनी खेळणार आहेत.
बिग बॉसच्या घरातून आतापर्यंत सहा स्पर्धक बाहेर पडले आहेत. यामध्ये निखिल राजेशिर्के, मेघा घाडगे, योगेश जाधव, त्रिशूल मराठे, रुचिरा जाधव, यशश्री मुसारकर हे स्पर्धक आहेत. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारा पुढील स्पर्धक कोण? याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे. घरातील सगळ्यांना सध्या किरण माने घराबाहेर गेले असल्याचे सांगण्यात आले असून बिग बॉसच्या घरातील सिक्रेट रुममध्ये बसून त्याला स्पेशल पॉवर मिळाली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.