
Bhola Bollywood Movie: सध्या अजय देवगण 'दृश्यम 2' या चित्रपटाला मिळालेल्या यशाचे सेलिब्रेशन करण्यात दंग आहे. 'दृश्यम 2' बॉक्स ऑफिसवर लवकरच १०० कोटींचा पल्ला गाठणार आहे. त्यामुळे त्याच्या सहित चित्रपटाची संपूर्ण टीम बरीच आनंदीत आहे. अजयच्या चाहत्यांनाही चित्रपट बराच आवडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर अजयने आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक गुड न्युज दिली आहे.
अजयच्या या बातमीमुळे चाहते कमालीचेच आनंदीत दिसून येत आहेत. कालच त्याच्या नव्या चित्रपटाचा प्रेक्षकांसमोर टीझर आलेला आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव 'भोला' असे आहे. या टीझरने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. ‘भोला’ चित्रपटाच्या टीझरनंतर एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे या चित्रपटाच्या नंतर अजय देवगण याचा पुढील भाग आणणार आहे.
अजय देवगण या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत बॉलिवूडचा भाईजान सलमान खान ही दिसणार आहे. अजय आणि सलमान हे दोघेही चांगले मित्र आहेत. यापूर्वी हे दोघेही 'सन ऑफ सरदार' मध्ये एकत्र दिसले होते. अजय चित्रपटात मुख्य कलाकार होता तर, सलमान पाहुणा कलाकार होता.
चित्रपट निर्मात्यांनीच आता अजयच्या आगामी चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. चित्रपट निर्मात्यांनी यावेळी सलमानच्या एंट्री बद्दल भाष्य केले आहे. 'अशी कोणतीच बातमी खरी नाहीये, सलमान- अजय हे दोघे फक्त मित्र आहेत. अजय देवगण सध्या या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनमध्ये व्यस्त आहे.’ चित्रपट निर्मात्यांनी सांगितल्यानंतर चित्रपटातील सलमानच्या एन्ट्रीच्या चर्चेला पूर्णविराम मिळणार हे नक्की.
अजय 'दृश्यम 2' प्रमाणे 'भोला' ही चर्चेत होता. हा चित्रपट त्याने स्वतः दिग्दर्शित केला असून यामध्ये त्याच्याबरोबर प्रमुख भूमिकेत अभिनेत्री तब्बू दिसणार आहे. यापूर्वी या दोघांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
‘भोला’ हा दाक्षिणात्य सुपरस्टार कार्थीचा ‘कैथी’ (Kaithi) या सुपरहिट चित्रपटाचा हिंदी रिमेक असून ‘कैथी’ हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. अजय देवगण उत्तम अभिनेता आहेच मात्र तो दिग्दर्शनाकडे वळला आहे. याआधी त्याने ‘शिवाय’ नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.