Disha Salian : दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? CBI अहवालातून धक्कादायक माहिती समोर

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयची मोठी माहिती
Disha Salian
Disha SalianSaam Tv

Disha Salian : टॅलेंट मॅनेजर आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्याशी संबंधित असलेली दिशा सालियान प्रकरणात CBIने (CBI) नवा खुलासा केला आहे. दारूच्या नशेत तोल जाऊन दिशा सालियनचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष सीबीआयने तपासानंतर काढला आहे. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती. सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह वांद्रे येथील भाड्याच्या घरात सापडण्याच्या पाच दिवसांपूर्वी दिशाचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येच्या तपासासोबतच सुरू होता.

भाजप नेते नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली होती. दिशा आणि सुशांत या सगळ्या प्रकरणांचा एकमेकांशी संबंध असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला होता. दिशा सालियानवर अत्याचार झाला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या गुन्ह्यात ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंचाही समावेश असल्याचा दावा राणेंनी केला होता. पण आता सीबीआयने दिशाचा मृत्यू नेमका कसा झाला हे स्पष्ट केलं आहे.

Disha Salian
Crime News : दिल्ली पुन्हा हादरली! तरुणानं अख्खं कुटुंबच संपवलं

काय आहे प्रकरण?

8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका बहुमजली इमारतीवरून दिशा सालियनने उडी मारून आत्महत्या केली असं सांगितलं जात होतं. दिशा ही बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची पूर्वीची मॅनेजर होती. दिशाच्या मृत्यूनंतर 5 दिवसांनी सुशांत सिंग राजपूत याचा त्याच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर या प्रकरणात अनेकांची चौकशी करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com