Pani Puri Pani Recipe: स्ट्रीट स्टाईल चटपटीत पाणीपुरीचे पाणी घरी कसं बनवाल? 'ही' आहे सीक्रेट रेसिपी, खाणारे खातच राहतील

Golgappa Recipe: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पाणीपुरीचे आंबट, गोड आणि तिखट पाणी बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या. कमी साहित्यात झणझणीत आणि चविष्ट पाणी तयार करून पाहुण्यांचे मन जिंका.
golgappa water
Pani Puri Pani RecipeGOOGLE
Published On

पाणीपुरी हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय असतो. छोट्या भूकेसाठी ही पाणीपुरी नेहमीच तयार असल्यासारखी आपल्या डोळ्यासमोर येते. बऱ्याचदा पाणीपुरी घरच्याघरी बनवून खाणं लोक पसंत करतात. पण घरच्या पाणीपुरीला रस्त्यावरच्या पाणीपुरीची टेस्ट नसते. त्यामुळे लोक बाहेरची पाणीपुरी खातात. पण तुम्हाला पाणीपुरीवाल्यानेच पाणीपुरीचं पाणी बनवायची सगळी रेसिपी सांगितली आहे. त्यामुळे तुम्ही घरच्याघरी कमी साहित्यात ही रेसिपी बनवू शकता. ही रेसिपी तुम्ही स्वत: पुरतीच नाही, तर घरी आलेल्या पाहुण्यांसाठीही बनवू शकता. कारण पाणीपुरीचं पाणी हे इतकं चविष्ठ होणार आहे.

पाणीपुरीच्या पाण्याची मूळ टेस्ट थोडी आबंट, थोडी गोड आणि थोडी तिखट असते. फक्त साखर, चिंच किंवा मिरची घालून ही टेस्ट मिळत नाही. अस्सल चवीसाठी, जुन्या चिंचेच्या गरासोबत गूळ वापरा. ​​गूळ पाणी घट्टच करत नाही, तर त्याला एक नैसर्गिक गोडवा देतो. पाणी स्वच्छ होण्यासाठी ते व्यवस्थित शिजवून गाळून घेणं यामध्ये महत्वाचं असतं. चला जाणून घेऊयात रेसिपी.

golgappa water
Gudi Padwa 2026 Wishes: गुढीपाडवा आला! प्रियजनांना पाठवा हे खास मेसेज; मराठी, हिंदी, इंग्रजी WhatsApp स्टेटस वाचा एका क्लिकवर

पाणीपुरीचे पाणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पुदिना, कोथिंबीर, सुंठ पावडर, कांचनार पावडर, काळी मिरी पूड, लवंग पूड, काळे मीठ, भाजलेले जिरे पूड, हिरव्या मिरच्या, हिंग, बर्फ, पाणी इत्यादी साहित्य यासाठी पुरेसं असेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये प्रमाणात बदल करु शकता. तसेच नको असलेले पदार्थ काढून टाकू शकता.

पाणीपुरीची कृती

पुदिना, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या बर्फासोबत मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यात सुंठ, कांचनार पावडर, काळी मिरी, लवंग पूड, काळे मीठ आणि भाजलेले जिरे घाला. हिंग कोमट पाण्यात विरघळवून मिश्रणात मिक्स करा. सर्व मिश्रण पाण्यात घालून नीट मिक्स करुन घ्या आणि ढवळत राहा. चवीनुसार आंबट-गोडपणा त्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्व्ह करण्यापूर्वी किमान एक तास फ्रिजमध्ये ठेवा. थंडगार, झणझणीत पाणीपुरीचे पाणी तयार होईल.

golgappa water
High BP: कामाच्या ठिकाणी हाय ब्लड प्रेशर कसा नियंत्रित ठेवायचा? डॉक्टरांनी दिले महत्त्वाचे सल्ले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com