Orry Gave Hint About Shruti Haasan Marriage Saam Tv
मनोरंजन बातम्या

Orry Gave Shruti Haasan Marriage Hint: श्रुती हासनने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकलं लग्न?; ऑरीने केला खुलासा

Shruti Haasan Marriage Rumours: सध्या सोशल मीडियावर कमल हासन यांची लेक श्रुती हासनने गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा सुरू आहे.

Chetan Bodke

Orry Gave Hint About Shruti Haasan Marriage

सध्या श्रुती हासन कमालीची चर्चेत आली आहे. ‘सालार पार्ट 1: सीझफायर’ या चित्रपटामुळे ती प्रचंड चर्चेत असून सध्या खाजगी आयुष्यामुळेही श्रुती चर्चेत आली आहे. सध्या 'रेडिट' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिने गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा सुरू आहे.

इतकंच नाही तर, श्रुती तिचा लाईफ पार्टनर शंतनू हजारिकासोबत ती राहत असल्याची चर्चा होत आहे. अनेक स्टारकिड्सचा बेस्ट फ्रेंड म्हणून ओळखला जाणाऱ्या ओरीने अर्थात ओरहान अवत्रमणीने 'रेडिट'वर केलेल्या एका कमेंटपासून ही चर्चा सुरू झाली आहे.

अलीकडेच ओरीने 'Ask Me' या सेशनचे आयोजन केले होते. यावेळी एका युजरने त्याला विचारले की, 'हाय ऑरी, तुझ्यासोबत फोटो काढताना कोणी अयोग्य वर्तन करणारा आणि फोटो काढायला तयार न झालेला कोणी सेलिब्रिटी आहे का? तुला नाव सांगायचे नसेल तर केवळ हिंट दे.' मात्र, या प्रश्नावर ओरीने श्रुती हासनचे नाव देत उत्तर दिले. (Social Media)

ऑरीने उत्तर दिले की, 'श्रुती हासन. मी तिला कधीही पोज देण्यासाठी सांगितले नाही. कारण एका कार्यक्रमात ती मला खूप उद्धटपणे वाटली होती. मी तिला ओळखत नसतानाही मला तिचा स्वभाव कळाला होता. मला खूप वाईट वाटलं, पण कदाचित गैरसमज झाला असेल. कारण तिच्या नवऱ्यासोबत माझे खूप चांगले संबंध आहेत. लवकरच हा विषय वेळेत सोडवला जाईल.' तेव्हा पासून तिच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. (Tollywood)

श्रुतीने एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, 'माझा लग्नाबाबत कुठलाही विचार नाही, कारण मला 'लग्न' शब्दाचीच भीती वाटते. आम्ही दोघे एकत्र खूप आनंदी आहोत आणि आमची केमिस्ट्री अनेक विवाहित जोडप्यांपेक्षा चांगली आहे.' अशी तिने कमेंट केली होती. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT