Maharashtra Budget 2026: अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांकडून अनेक मोठ्या घोषणा, काय स्वस्त अन् काय महाग? वाचा एका क्लिकवर

CM Devendra Fadnavis Big Announcements: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाची आज घोषणा केली. अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर नेमकं काय स्वस्त झालं आणि काय महाग झालं हे घ्या जााणून...
Maharashtra Budget 2026: अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांकडून अनेक मोठ्या घोषणा, काय स्वस्त अन् काय महाग? वाचा एका क्लिकवर
Maharashtra Budget Devendra Fadnavis AnnouncementSaam Tv
Published On

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प २०२६-२७ सादर केला. या अर्थसंल्पाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. शेतकरी, विद्यार्थी, महिला, नोकरदारवर्ग, व्यावसायिक या सर्व जण या अर्थसंकल्पाची वाट पाहत होते. काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. अखेर आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर काय स्वस्त झालं आणि काय महाग झालं हे आपण जाणून घेणार आहोत...

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी २ लाखांपर्यंत कर्जमाफी केली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. यावेळी त्यांनी अजित पवारांचे भव्य स्मारक बांधण्यात येणार असून त्यांच्या नावाने गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली.

राज्यात ८ ते १० शैक्षणिक शहरे विकसित करण्यात येणार आहेत. मुंबईकरांना हक्काचे घर मिळणार आहे. मुंबईमध्ये २० लाख झोपडपट्टी घरांच्या पुनर्विकासासाठी आणि परवडणारी घरं निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली. वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई विकसित केली जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Maharashtra Budget 2026: अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांकडून अनेक मोठ्या घोषणा, काय स्वस्त अन् काय महाग? वाचा एका क्लिकवर
Maharashtra Budget 2026: मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा, पण किती रूपयांपर्यंत माफ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सर्व माहिती

काय स्वस्त झालं?

अर्थसंकल्पामुळे कर्करोग आणि मधुमेहाच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. अर्थसंकल्पाची घोषणा केल्यानंतर वैद्यकीय उपकरणं, मधुमेहावरील उपचार, कर्करोगावरील औषधं, क्रीडा साहित्य आणि सौर पॅनल हे स्वस्त झाले आहेत. मोटर वाहन करामध्ये ३० टक्के सूट देण्यात आली. शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली. नियमित कर्ज भरणाऱ्यांना ५० हजारांची मदत मिळणार आहे.

काय महाग झालं?

अर्थसंकल्पाची घोषणा केल्यानंतर दारू, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ महाग झाले आहेत.

Maharashtra Budget 2026: अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांकडून अनेक मोठ्या घोषणा, काय स्वस्त अन् काय महाग? वाचा एका क्लिकवर
Maharashtra Budget 2026: शेतकरी- लाडकी बहीण, रस्ते अन् मेट्रो, अर्थसंकल्पात काय- काय घोषणा? वाचा सर्वकाही एका क्लिकवर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com