मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे काय होणार याची स्पष्टता या अर्थसंकल्पात फडणवीसांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजना या पुढे ही अशीच सुरू राहणार आहे. या योजनेसाठी सरकार भरीव तरतूद करत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र किती पैसे वाढणार आहेत. याबाबत त्यांनी कुठलीही ग्वाही दिली नाही, त्यामुळे सध्या तरी 1500 रुपये नियमित मिळणार हे स्पष्ट झाले आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण, योजनेतील लाभयार्थ्याना आर्थिक आर्थिक साक्षर करून लभाचे व्यवस्थापन, गुंतवणुकीचे मार्गदर्शन करणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.