Gautami And Swanand Marriage
Gautami And Swanand MarriageSaam Tv

Mrunmayee Deshpande Video: कधीच सोडू नको तिची साथ..., गौतमी- स्वानंदच्या लग्नात मृणमयी देशपांडेचा जबरदस्त उखाणा

Gautami And Swanand Marriage: लाडक्या बहिणीच्या लग्नामध्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने खूप धम्माल केली. मृण्मयीने यावेळी बहिणीसाठी खास उखाणा घेतला. त्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.
Published on

Gautami Deshpande And Swanand Tendulkar Wedding:

‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरामध्ये पोहचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) नुकताच विवाहबंधनात अडकली. गौतमीने २५ डिसेंबरला अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर स्वानंद तेंडुलकरसोबत (Swanand Tendulkar) लग्नगाठ बांधली. पुण्यामध्ये मोठ्या धुमधडाक्यात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लाडक्या बहिणीच्या लग्नामध्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने खूप धम्माल केली. मृण्मयीने यावेळी बहिणीसाठी खास उखाणा घेतला. त्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

गौतमी आणि मृण्मयी या बहिणींचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे आपण सोशल मीडियावर नेहमी पाहत असतो. या दोघींमधील केमिस्ट्री देखील सर्वांना प्रचंड आवडते. इन्स्टाग्रामवर गौतमी आणि मृण्मयी अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. त्याला देखील दोघांच्या चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळते. नुकताच गौतमीचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नात लाडक्या बहिणीची करवली देखील मृण्मयीच होती. लग्न सोहळ्यामध्ये मृण्मयीने खूप धमाल केली.

गौतमी आणि स्वानंदच्या लग्नाचे संपूर्ण विधी पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या वाइल्डर्नेस्ट हिलटॉप रिसॉर्टमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये पार पडले. या लग्नामध्ये नवरा नवरीच्या शेल्याची गाठ बांधण्याचा विधी पार पडला. यावेळी शेल्याला गाठ बांधणाऱ्या व्यक्तीला नवऱ्याचे नाव घेत उखाणा घ्यावा लागतो. गौतमीची करवली झालेल्या मृण्मयीनेच तिच्या शेल्याची गाठ बांधली. यावेळी तिने गौतमी- स्वानंदसाठी खास उखाणा घेतला.

Gautami And Swanand Marriage
Ronit Roy Wedding: ५८ वर्षांचा बॉलिवूड अभिनेता तिसऱ्यांदा चढला बोहल्यावर, गोव्यातील मंदिरामध्ये केलं लग्न; VIDEO व्हायरल

मृण्मयीने गौतमी आणि स्वानंदच्या शेल्याची गाठ बांधताना जबरदस्त अंदाजमध्ये उखाणा घेतला. उखाण्यामध्ये ती म्हणते की, 'गौतमी आणि स्वानंदची आयुष्यभरासाठी बांधलीय घट्ट गाठ, स्वप्नीलनं जशी माझी नाही सोडली तशीच स्वानंद कधीच सोडू नको तिची साथ.' मृण्मयीच्या उखाण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऐवढंच नाही तर गौतमीच्या लग्नामध्ये कान पिळण्याच्या विधीमध्ये देखील मृण्मयीने स्वानंदचा कान पिळण्याची संधी सोडली नाही. याचे देखील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Gautami And Swanand Marriage
Amitabh Bachchan : ८१ व्या वर्षी बिग बींचा जबरदस्त वर्कआऊट, VIDEO पाहून चाहते फिटनेसचे करत आहेत कौतुक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com