Amitabh Bachchan Workout Video
Amitabh Bachchan Workout VideoSaam Tv

Amitabh Bachchan : ८१ व्या वर्षी बिग बींचा जबरदस्त वर्कआऊट, VIDEO पाहून चाहते फिटनेसचे करत आहेत कौतुक

Amitabh Bachchan Workout Video: अमिताभ बच्चन ८१ वर्षांचे आहे. ऐवढ्या वयातही ते आजही नियमित व्यायाम करतात. नुकताच त्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
Published on

Amitabh Bachchan Fitness:

बॉलिवूडचे (Bollywood) महानायक अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडयावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. या माध्यमातून ते ठामपणे आपले मत व्यक्त करतात, त्याचसोबत त्यांच्या नव्या प्रोजेक्ट आणि आयुष्याशीसंबंधित बऱ्याच गोष्टी ते चाहत्यांना सांगतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडीओ (Amitabh Bachchan Video) शेअर केला आहे. गार्डनमध्ये वर्कआऊट करतानाचा त्यांचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन ८१ वर्षांचे आहे. ऐवढ्या वयातही ते आजही नियमित व्यायाम करतात. नुकताच त्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. गार्डनमध्ये पळताचानाचा त्यांचा हा व्हिडीओ असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या वयातही अभिनेत्याची जबरदस्त एनर्जी पाहून चाहते त्यांचे कौतुक करत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी इन्स्टावर हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हुडी कॅपने 'कीप' हा शब्द व्यापला आहे... म्हणून 'कीप गोइंग' आहे... डीओपी आणि अभिषेकला धन्यवाद.' अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टला ७ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. या पोस्टवर 'रिअल मॅन', 'पळत राहा', 'इन्स्पायरेशन' अशाप्रकारच्या कमेंट्स त्याच्या चाहत्यांनी केल्या आहेत.

Amitabh Bachchan Workout Video
Ronit Roy Wedding: ५८ वर्षांचा बॉलिवूड अभिनेता तिसऱ्यांदा चढला बोहल्यावर, गोव्यातील मंदिरामध्ये केलं लग्न; VIDEO व्हायरल

दरम्यान, अमिताभ बच्चन आणि रजनीकांत तब्बल ३३ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. हे दोन्ही सुपरस्टार 'थलाइवर 170' या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे सध्या शूटिंग सुरू आहे. बिग बी सध्या 'कौन बनेगा करोडपती' हा शो होस्ट करत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून ते हा शो होस्ट करत आहेत. त्यांच्या या शोला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो.

Amitabh Bachchan Workout Video
Main Atal Hoon First Song: ‘मैं अटल हूं’ मधील पहिलं गाणं रिलीज, 'देश पहले' गाण्याने जिंकलं प्रेक्षकांचं मन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com