Main Atal Hoon First Song: ‘मैं अटल हूं’ मधील पहिलं गाणं रिलीज, 'देश पहले' गाण्याने जिंकलं प्रेक्षकांचं मन

Desh Pehle Song Out: पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) या चित्रपटामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाबाबत प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. या चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे.
Desh Pehle Song Out
Desh Pehle Song OutSaam Tv
Published On

Main Atal Hoon Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) ‘मैं अटल हूं’ या चित्रपटामुळे (Main Atal Hoon Movie) सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे. पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) या चित्रपटामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाबाबत प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. त्यानंतर आता या चित्रपटातील पहिलं गाणं 'देश पहले' रिलीज करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या'मैं अटल हूं' या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमधील उत्सुकता खूपच वाढली होती. आता या चित्रपटातील 'देश पहले' हे पहिले गाणं रिलीज झाले आहे. हे गाणं 25 डिसेंबर रोजी म्हणजेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 99 व्या वाढदिवसानिमित्त रिलीज करण्यात आले. पंकज त्रिपाठीने या गाण्यात अटलबिहारी वाजपेयींची भूमिका उत्तमरित्या साकारल्याचे दिसत आहे.

हे गाणे पाहिल्यानंतर तुम्हाला कवी आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या त्या काळामध्ये घेऊन जाते. ज्यांनी इतिहासाचे पुनर्लेखन केले. जुबिन नौटियाल यांनी गायलेल्या या गाण्याचे हृदयस्पर्शी बोल मनोज मुंतशिर यांनी लिहिले आहेत. पायल देव यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. 'मैं अटल हूं' मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत असलेला पंकज त्रिपाठी आपल्याला त्यांचे असामान्य आयुष्य दाखवतो.

'देश पहेले' हे गाणं पंकज त्रिपाठीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. हे गाणं शेअर करत कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, 'जगातील सारे सुख मागे, माझा देश आधी.' पंकज त्रिपाठीच्या चित्रपटातील हे गाणे त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या गाण्याबद्दल आणि पंकज त्रिपाठीच्या अभिनयाबद्दल चाहते खूप सकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

देशाचे सर्वांचे लाडके नेते, अटलबिहारी वाजपेयी, शिक्षण, विज्ञान, पायाभूत सुविधा आणि जागतिक संबंध मजबूत करण्यासाठी त्यांच्या योगदानासाठी प्रसिद्ध आहेत. चित्रपटाचा ट्रेलर तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी यांचे बालपणीचे दिवस, राजकीय कारकीर्द, बदल घडवून आणण्यासाठी आणि भारताला एक महान राष्ट्र बनवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न दिसत आहेत.

Desh Pehle Song Out
Nana Patekar: २०२४ मध्ये भाजपच येणार, नाना पाटेकरांकडून PM मोदींचे तोंडभरून कौतुक

दरम्यान, हा चित्रपट पुढच्या वर्षी 19 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांच्या या चित्रपटात अनेक स्टार्स दिसणार आहेत. भानुशाली स्टुडिओज लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओजच्या पाठिंब्याने या चित्रपटाची पटकथा ऋषी विरमानी आणि रवी जाधव यांनी लिहिली आहे. तर सलीम-सुलेमान यांनी मनोज मुंतशिर यांच्या गीतांसह संगीत दिले आहे.

Desh Pehle Song Out
Shivali Parab Video: स्टेजवर परफॉर्म केल्यानंतर शिवाली परब झाली भावुक, स्ट्रगलच्या काळातली हळवी आठवण सांगितली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com