Viral Video: मॅगीच्या एका पाकिटात किती नूडल्स असतात? तरुणाने मोजला एक-एक नूडल, व्हिडिओ व्हायरल

viral video counting maggi noodles strands: एका मॅगीच्या पाकिटात नेमके किती नूडल्स असतात? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने मॅगी नूडल्स मोजण्याचा प्रयोग केला आहे.
viral video counting maggi noodles strands
viral video counting maggi noodles strandssaam tv
Published On

जर आपल्याला छोटी भूक लागली असेल आणि काही टेस्टी खावसं वाट असेल तर आपण मॅगीचा ऑप्शन समोर ठेवतो. अवघ्या काही मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी विद्यार्थ्यांपासून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणांपर्यंत अनेकांची आवडती आहे. विशेषतः हॉस्टेल किंवा पीजीमध्ये राहणाऱ्यांसाठी मॅगी म्हणजे झटपट तयार होणारं एक खाद्याचं आहे.

पण कधी तुम्ही विचार केला आहे का की, एका मॅगीच्या पाकिटात नेमके किती नूडल्स असतात? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे हा मजेशीर प्रश्न चर्चेत आला आहे.

viral video counting maggi noodles strands
Train viral video: थरारक! ट्रेन पकडण्यासाठी महिलेने जीव धोक्यात घातला, रेल्वे स्टेशनवरील धडकी भरवणारा VIDEO

इन्स्टाग्रामवर ondw.ay नावाच्या हँडलवरून शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने मॅगीच्या पाकिटातील नूडल्स मोजण्याचा प्रयोग केला आहे. व्हिडिओमध्ये तो आधी मॅगीचं पाकिट उघडतो आणि नूडल्स पाण्यात टाकून त्यांना नीट वेगळे करतो. चिकटून राहिलेले भाग सुटावेत म्हणून तो नूडल्स हलक्या हाताने वेगळे करतो. त्यानंतर तो प्रत्येक नूडल स्ट्रँड वेगवेगळा मोजायला सुरुवात करतो.

या प्रयोगानुसार एका मॅगीच्या पाकिटात साधारण 90 नूडल स्ट्रँड्स असल्याचा दावा करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर या सर्व नूडल्सची एकत्रित लांबी मोजल्यावर ती जवळपास 1920 इंच म्हणजेच सुमारे 166 फूट किंवा 50 मीटरपेक्षा जास्त असल्याचे व्हिडिओमध्ये दाखवले आहे. इंच टेपच्या साहाय्याने ही लांबी मोजताना तो मोजत असतो. एवढ्या लांबीचे नूडल्स इतक्या छोट्या पाकिटात कसे बसतात, याबद्दल तो आश्चर्य व्यक्त करताना दिसतो.

viral video counting maggi noodles strands
Viral Video: नवरीच्या एन्ट्रीला आतषबाजी लावणं पडलं महागात; थोडक्यात वाचला जीव, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर या व्हिडीओला आतापर्यंत सुमारे 3 लाख 59 हजारांहून अधिक लाईक्स मिळालेत. अनेक युजर्सनी यावर मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्यात. एका युजरने लिहिलंय की, 'भावाला शेवटी आयुष्यातला उद्देश सापडला.' तर दुसऱ्याने म्हटलंय की, 'किती रिकामा माणूस आहे!' आणखी एका युजरने 'बेरोजगार प्रो मॅक्स' असा विनोदी कमेंट करत व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली.

viral video counting maggi noodles strands
Viral Video: अगं बाई बस खाली...! बुमराहच्या गोलंदाजीवर साक्षीचं रिएक्शन व्हायरल, धोनीलाही हसू आवरेना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com