ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांचा आज वाढदिवस. ७ नोव्हेंबर १९५४ चा कमल हासन यांचा जन्म. आपल्या अभिनयासोबतच त्यांच्या खास शैलीने चाहत्यांचे मन जिंकले. उत्तम अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता, पार्श्वगायक म्हणून कमल हासन यांची भारतीय सिनेसृष्टीत ओळख आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या रिल लाईफबद्दल...
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कमल हासन यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. त्यांच्या सिनेकारकिर्दिला ६१ वर्ष पूर्ण झाले आहेत. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या कमल हासनच्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रपती सुवर्णपदकाने गौरविण्यात आले होते.
कायमच आपल्या वैविध्यपूर्ण कलाकृतीसाठी कमल हासन यांची सर्वत्र ओळख आहे. कमल हासन यांचे खरं नाव 'पार्थसारथी' आहे. कमल हासन यांच्या 'मूंद्रम पिराई', 'नायकन', 'इंडियन', 'विश्वरूपम', 'तेवर मगन' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या सिनेकारकिर्दीत आतापर्यंत पाचहून अधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कमल हासन तब्बल एकूण पाच महिलांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी १९७० मध्ये अभिनेत्री श्रीविद्यासोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. तेव्हाच त्यांच्या दोघांच्याही अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण त्यांचे नाते जास्त दिवस टिकले नाही.
नंतर कमल यांनी १९७८ मध्ये वाणी गणपतीसोबत लग्न केले आणि १० वर्षांनंतर एकमेकांपासून घटस्फोट घेतला. मग नंतर, अक्षराने त्यांच्या आयुष्यामध्ये प्रवेश केला. मग तेव्हापासून त्यांच्या आणि अभिनेत्री सारिकाच्या नावाची चर्चा व्हायला लागली. (Tollywood)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाआधीच दोघेही एका मुलीचे पालक झाले. नंतर त्यांनी लग्न केले. लग्नानंतर कमल हसन आणि सारिका यांना आणखी एक मुलगी झाली. कमल आणि सारिका यांना श्रुती आणि अक्षरा अशा दोन मुली आहेत. त्यांचेही नाते फार काळ काही टिकले नाही, त्यांनी २००४ घटस्फोट घेतला.
सोबतच कमल हासन लव्ह अफेअर्समुळेही चर्चेत राहायचे. कमल यांचे आपल्यापेक्षा २२ वर्ष लहान असणाऱ्या सिमरन बग्गासोबतही नाव जोडले होते. ते दोघेही जवळपास १३ वर्ष लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिले होते. त्यांच्या नावाची तुफान चर्चा झाली असली तरी, त्यांनी एकमेकांसोबत लग्न केले नाही. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.