Rashmika Mandanna: हे सर्व पाहून खूपच दु:ख झालं, व्हायरल व्हिडीओवर रश्मिका मंदानाची पहिली प्रतिक्रिया

Rashmika Mandanna Viral Video: व्हायरल व्हिडीओनंतर रश्मिका मंदानाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर आणि ट्विटवर एक भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे.
Rashmika Mandanna
Rashmika MandannaSaam TV

Rashmika Mandanna First Reaction On Viral Video:

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) मॉर्फ व्हिडीओमुळे सध्या चर्चेत आली आहे. रश्मिका मंदान्नाच्या या व्हिडीओवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी नाराजी व्यक्त केली आहे. आता या व्हिडीओवर अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

रश्मिका मंदानाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर आणि ट्विटवर एक भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. यामाध्यमातून तिने नाराजी व्यक्त केली आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर होत असल्याचे लोकांना सांगण्याची गरज असल्याचे तिने सांगितले आहे. अभिनेत्रीने तिचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांचे आभार मानले. माझा डिपफेक व्हिडिओ ऑनलाइन पसरवला गेले हे खूप भयानक होते असे देखील तिने सांगितले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रश्मिकाने आपल्या अधिकृत एक्स म्हणजेच ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'मला हे सांगताना खूप दु:ख होत आहे. पण मला ऑनलाइन पसरवल्या जाणाऱ्या माझ्या डीप फेक व्हिडीओवर बोलायचे आहे. खरे सांगायचे तर असा व्हिडीओ फक्त माझ्यासाठीच नाही तर प्रत्येकासाठी खूप भीतीदायक आहे. तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे आज लोकांचे खूप नुकसान होत आहे.'

रश्मिका मंदान्नाच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक ब्रिटिश-भारतीय महिला काळ्या रंगाच्या डीप नेक टाइट जिम वेअरमध्ये लिफ्टच्या आतमध्ये आल्याचे दिसत. या महिलेचा चेहरा रश्मिका सारखा दिसण्यासाठी आर्टिफीशियल इंटेलिजेंसद्वारे एडिट केला गेला आहे. हा व्हिडीओ रविवारी वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला.

अभिनेत्रीने पुढे सांगितले की, 'आज एक महिला आणि एक अभिनेत्री म्हणून मी माझे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांची आभारी आहे. जे माझे प्रोटेक्शन आणि सपोर्ट सिस्टम आहेत. पण मी शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना माझ्यासोबत हे घडलं असतं तर मी ते कसे हाताळले असते याची कल्पनाच करू शकत नाही. आपल्यापैकी अधिक लोकांना अशा घटनेचा त्रास होतो. पण एक समुदाय म्हणून आपण त्वरित याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.'

Rashmika Mandanna
Malaika Arora: 'हिच्यासमोर उर्फी जावेदही फेल', मलायका अरोरा नव्या ड्रेसिंग स्टाइलमुळे ट्रोल

रश्मिकाने या ट्विटमध्ये, सायबराबाद पोलिस आणि महाराष्ट्र सायबर, महाराष्ट्रासाठी सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी नोडल एजन्सी यांचे अधिकृत हँडल टॅग केले आहे. रश्मिकाला तिच्या पोस्टवर लोकांनी पाठिंबा दिला. एका यूजरने लिहिले की, 'आम्ही यात तुमच्यासोबत आहोत!!! तंत्रज्ञानाच्या अशा गैरवापराचा सामना करण्यासाठी आपण जागरूकता वाढवू आणि एकत्र काम करू या. यामध्ये तुम्ही एकटे नाही आहात आणि आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो.'

दुसऱ्या युजरने सांगितले की, 'या व्हिडिओवर नंतर कारवाई करण्यापेक्षा आत्ताच कारवाई करणे चांगले.' आणखी एका युजरने लिहिले की, 'खोट्या व्हिडिओंमुळे होणारे नुकसान पाहून निराशा होत आहे. तंत्रज्ञानाच्या गैरवापराच्या परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि एकमेकांना ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यासाठी एकत्र काम करूया.'

Rashmika Mandanna
Salman Society Trailer: देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल, 'सलमान सोसायटी'चा ट्रेलर रिलीज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com