मराठी सिनेसृष्टीत (Marathi Film Industry) सध्या नवीन नवीन विषयांवर आधारित चित्रपट येत आहेत. हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरत आहेत. अशामध्ये प्रेक्षक बहुप्रतीक्षित 'सलमान सोसायटी' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
या चित्रपटाच्या गाण्यांनंतर आता दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटातील अनाथ मुलांची शिक्षण घेण्यासाठीची धडपड सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणणारी असल्याचे दिसून येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सध्या सोशल मीडियावर सलमान सोसायटी या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची ३ गाणी रिलीज झाली होती. ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. अशामध्ये आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये खूप इमोशन, ड्रामा आणि कॉमेडी पाहायला मिळत आहे.
सलमान सोसायटी हा चित्रपट समाजातील अनाथ मुले आणि शिक्षणापासून वंचित मुलांवर भाष्य करतो. एकूण हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. ट्रेलरमध्ये लहानग्यांची शिक्षणासाठीची धडपडड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दिग्दर्शक कैलाश पवार आणि निर्मात्यांनी प्रयत्न केला आहे की, या भटक्या, अनाथ मूलांची व्यथा सर्वांसमोर यावी आणि यावर प्रबोधन होऊन या मुलांना योग्य ते शिक्षण मिळावे .
अवंतिका दत्तात्रय पाटील प्रस्तुत 'सलमान सोसायटी' या चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार आणि निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप, शांताराम खंडू भोंडवे आणि वैशाली सुरेश चव्हाण प्राजक्ता एन्टरप्राईजेसच्या बॅनरअंतर्गत केली आहे . 'सलमान सोसायटी' हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारित हा चित्रपट आहे.
या चित्रपटाला संगीत श्रेयस आंगणे, मॅक्सवेल फर्नांडिस आणि मिलिंद मोरे यांनी दिले आहे. या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारा गौरव मोरे एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. याची खास झलक तुम्हाला ट्रेलरमधून दिसलीच असेल. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
त्याचप्रमाणे या चित्रपटामध्ये उपेंद्र लिमये पहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. तसेच चित्रपटामध्ये देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर, नरेंद्र केरेकर, तेजस बने हे कलाकार देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या १७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.