'सैराट' फेम अभिनेतचा आकाश ठोसर (Aakash Thosar) सध्या चर्चेत आला आहे. अक्षय ठोसर त्याच्या आगामी चित्रपट किंवा फिटनेसमुळे तो चर्चेत नाही. तर तो चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे अक्षय ठोसर भ्रष्टाचारविरोधी मोहिमेसाठी मैदानात उतरला आहे.
मुंबईत इंडियन बँकेच्या वतीने भ्रष्टाचार विरोधी जनजागृती (anti corruption campaign) करण्यासाठी वॉकेथॉन आयोजित करण्यात आली होती. या जनजागृती मोहिमेमध्ये आकाश ठोसरने सहभाग घेतला. यावेळी त्याने 'आपल्या आरोग्यासाठी फिटनेसला जवळ करणे जसे महत्वाचे असते, तसेच आपल्या देशाच्या आरोग्यासाठी भ्रष्टाचारला दूर ठेवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुंबईत इंडियन बँकेच्या (Indian Bank) वतीने भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या वॉकेथॉनमध्ये बँकेचे कर्माचारी आणि मुंबईकर नागरिकांसह अभिनेता आकाश ठोसर सहभागी झाला होता. आकाश ठोसरला पाहून त्याच्या चाहत्यांनी फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आकाशने मरीन ड्राईव्ह इथे मुंबईकरांसोबत मनसोक्त फोटो सेशनही केले. यावेळी आकाशने सर्वांशी संवाद साधताना देशाच्या आरोग्यासाठी भ्रष्टाचाराला दूर ठेवणं किती गरजेचे आहे याचे महत्व समजावून सांगितले.
यावेळी आकाशने सांगितले की, 'भ्रष्टाचारविरोधात बोलायला हवं, छोट्या-छोट्या पावलांनीच सुरुवात होते. याविषयी बोललं पाहिजे. जमेल तिथे आवाज उठवला पाहिजे. फिटनेसच्या माध्यमातून केलेल्या या जनजागृतीमुळे नक्कीच फायदा होईल आणि अनेक जण सजग होतील.' यावेळी आकाशने लवकरच बहुचर्चित 'बाल शिवाजी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे देखील सांगितले.
आकाशला फिटनेसची खूप आवड आहे. आकाश फिटनेस फंडा आवडीने जपतो. सोशल मीडियावर तो नेहमी फिटनेसचे महत्व आणि वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ शेअर करत असतो. अशामध्ये यावेळी आकाशने मुंबईकरांना फिटनेसचे महत्व देखील सांगितले. 'आपण प्रत्येकाने शरीराची काळजी घ्यायलाच हवी आणि त्यासाठी दररोज किमान एक तास व्यायामासाठी द्यायला हवा असे आकाशने सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.