Hansika Motwani On Hormonal Injection: दोन वर्षात बालकलाकार नायिका कशी झाली? हार्मोनल इंजेक्शनवर हंसिका मोटवानीचा खुलासा

Rumours Of Hansika Motwani: हंसिकाने मुलाखतीत तिच्यावरचे आरोप फेटाळून लावले आहेत.
Hansika Motwani
Hansika MotwaniInstagram @ihansika

Hansika Motwani Reaction On Hormonal Injection Rumors:अभिनेत्री हंसिका मोटवानीला शरीराची जलद वाढ होण्यासाठी इंजेक्शन घेतल्याचे नेहमीच बोलले जाते. या इंजेक्शननंतर तिच्या शरीरात अचानक बदल झाला. बाल कलाकार म्हणून काम करणाऱ्या हंसिकाने चित्रपटांमध्ये नायिका साकारायला सुरुवात केली.

हंसिका मोटवानी आणि तिच्या आईने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या आरोपांवर भाष्य केले आहे. हे सर्व आरोप निराधार असल्याचे हंसिकाचे म्हणणे आहे. तिने हार्मोनल वाढीचे कोणतेही इंजेक्शन घेतले नाही. तिच्या शरीरात जे काही बदल झाले ते अगदी नैसर्गिक पद्धतीने झाले.

हंसिका आणि तिच्या आईने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत या सर्व बातम्या खोट्या असल्याचे म्हणत आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, सुरुवातीला अशा गोष्टींमुळे ती दुःखी व्हायचा. पण आता या गोष्टींचा त्यांना फारसा फरक पडत नाही. (Latest Entertainment News)

Hansika Motwani
The Kerala Story 14th Day Box Office Collection: 'द केरला स्टोरी' घोडदौड सुरूच! कोविडनंतर सर्वाधिक कमाई करणार ४था चित्रपट

हार्मोनल वाढीचे इंजेक्शन घेण्याच्या प्रश्नावर बोलताना हंसिकाची आई मोना मोटवानी म्हणाली, “माझ्यावर हंसिकाला इंजेक्शन दिल्याचा आरोप होता. हे इंजेक्शन काय आहे? त्याबद्दल मला सांगा आणि मी टाटा आणि बिर्लांपेक्षा श्रीमंत होईन.

कोणती आई आपल्या मुलासोबत असे कृत्य करेल, मला सांगा? किंवा मला सांगा असे कोणते इंजेक्शन आहे, ज्याने शरीराची हाडेही विकसित होतात! काही विचित्र लोक आहेत, काही लोक अंधारात राहून इतरांबद्दल चुकीच्या गोष्टी लिहिण्यासाठी पैसे खर्च करतात. आणि लोक लिहतातही. तुम्हाला माहीत देखील नसतं की तुमच्याबद्दल एवढं वाईट कोण लिहित आहे.

याविषयी हंसिका मोटवानी म्हणाली की, "सेलिब्रेटी असण्याचे फायदे आणि तोटे आहेत. काही गोष्टींसाठी तुम्हाला या व्यवसायात तयार राहावे लागेल. मला या बातम्यांची फारशी माहिती नव्हती. कारण हे सर्व जेव्हा घडले जेव्हा सोशल मीडिया इतका लोकप्रिय झाला नव्हता."

Hansika Motwani
Sara Ali Khan At Cannes Film Festival: कान्समध्ये साडीत दिसली सारा; आजी शर्मिला टागोरच्या लूकची कॉपी

हंसिकाने गेल्या वर्षी सोहेल कथुरियासोबत लग्न केले. त्यांच्या लग्नावर एक शो बनवण्यात आली आहे, हा शो डिस्ने+हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. 'लव्ह शादी ड्रामा' नावाच्या या शोमध्ये हंसिकाने हार्मोनल इंजेक्शन्सच्या बातम्यांबद्दल सांगितले आहे.

हंसिका मोटवानी पुढे म्हणाली, “आम्ही ते लपवले नाही कारण त्यात तथ्य नाही. मला कोणतेही इंजेक्शन घेऊ शकत नाही. म्हणूनच मी आजपर्यंत एकही टॅटू काढलेला नाही. कारण मला सुयांची खूप भीती वाटते.

आई आपल्या मुलीशी असं का करेल? यामागचं कारण अगदी स्पष्ट आहे, तुमच्या प्रगतीवर लोक जाळतात. पण हरकत नाही. मला असे वाटते की कुठेतरी मी काहीतरी बरोबर करत आहे ज्याबद्दल लोक बोलत आहेत. तुम्ही तुमचा काम करत राहा.

हंसिकाने 2003 मध्ये तब्बू स्टारर 'हवा' चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. पुढे तिने 'कोई मिल गया', 'जागो', 'हम कौन हैं' आणि 'अबरा का डबरा' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय तिने 'शका लाका बूम बूम', 'सोन परी' आणि 'करिश्मा का करिश्मा' यांसारख्या लहान मुलांच्या टीव्ही शोमध्येही काम केले.

2007 मध्ये हंसिकाने नायिका म्हणून पदार्पण केले. अल्लू अर्जुन स्टारर 'देसमुदुरु' आणि हिमेश रेशमियाचा 'आप का सुरुर' हे तिचे त्यावर्षीचे पहिले चित्रपट होते. त्यानंतर आरोप होऊ लागले की दोन वर्षांत हंसिकाने बाल कलाकारापासून चित्रपटांमध्ये नायिकेची भूमिका साकारण्यास सुरुवात केली. ती अचानक इतकी मोठी कशी झाली?

हंसिकाचा 'महा' 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. आगामी काळात ती 'पार्टनर', 'राउडी बेबी', 'गांधारी'सह अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com