The Kerala Story Day 9 Collection
The Kerala Story Day 9 CollectionSaam TV

The Kerala Story 14th Day Box Office Collection: 'द केरला स्टोरी' घोडदौड सुरूच! कोविडनंतर सर्वाधिक कमाई करणार ४था चित्रपट

Top Bollywood Film: बॉलिवूडमध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कलेक्शन करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'द केरला स्टोरी' चित्रपट चौथ्या स्थानी आहे.

The Kerala Story Box Office Collection: 'द केरला स्टोरी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन १४ दिवस झाले आहेत. तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. कोरोनानंतर बॉलिवूडमध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कलेक्शन करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'द केरला स्टोरी' चित्रपट चौथ्या स्थानी आहे.

दुसऱ्या आठवड्यात चित्रपट १५० कोटींच्या जवळ पोहोचला होता. तर 'द केरला स्टोरी' चित्रपट या आठवड्यात २०० कोटी पार करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. 'द केरला स्टोरी' चित्रपटाची कमी पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरून अजून काही दिवस तरी खाली येणार नाही. (Latest Entertainment News)

The Kerala Story Day 9 Collection
Mann Ki Baat: पंतप्रधानांच्या ‘मन की बात'मध्ये‘मराठी सूर', संजय गीतेंंचं गाणं होणार रेडिओवर प्रसिद्ध...

प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. 'द केरला स्टोरी' अवघ्या 12 दिवसांत वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला आणि आता बुधवारी म्हणजेच 14 व्या दिवशीही या चित्रपटाने उत्तम कलेक्शन केले आहे.

ब्लॉकबस्टर हिट 'द केरला स्टोरी'ने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या बुधवारी सुमारे 9 ते 9.50 कोटी कमावले आहेत. चित्रपटाच्या कमाईत मात्र ५% ची घट झाली आहे. चित्रपटाच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर तो 175 कोटींच्या जवळ पोहोचला आहे.

'द केरला स्टोरी'ने दुसऱ्या वीकेंडला १०० कोटींचा आकडा गाठला होता. आता तिसऱ्या शनिवारी किंवा रविवारी हा चित्रपट २०० कोटींचा आकडा पार करेल असे मानले जात आहे. 'द केरला स्टोरी' हा कोविड-19 महामारीनंतर बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चौथा बॉलिवूड चित्रपट ठरेल. हा चित्रपट 250 कोटींहून अधिक कमाई करेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

The Kerala Story Day 9 Collection
Maharashtra Rajya Natya Spardha In Safarchand: मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेत ‘सफरचंद’ची बाजी; शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा...

अदा शर्माचा चित्रपट ऑस्ट्रेलिया आणि यूकेमध्येही चांगली कमाई करत आहे. 'द केरला स्टोरी' जागतिक व्यासपीठावर 40 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटाला लोकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. चित्रपटाच्या कथेसोबतच अदा शर्माच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com