Kamal Haasan Hospitalised
Kamal Haasan HospitalisedSaam Tv

Kamal Haasan : सुपरस्टार कमल हासन यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात उपचार सुरू

कमल हसन यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Published on

Kamal Haasan Hospitalised : साऊथ सुपरस्टार कमल हासन यांची तब्येत ठीक नसून त्यांची प्रकृती खालवली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमल हासन यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तब्येत खालावली असल्याची माहिती आहे.  (Latest Marathi News)

Kamal Haasan Hospitalised
Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट; कुटुंबीयांनी दिलं स्पष्टीकरण

अहवालानुसार, कमल हासन यांना बुधवारी खूप ताप आला, त्यानंतर त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. चिंता करण्याचं कुठलंही कारण नसल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी त्यांना पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, काही रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे, की कमल हासन यांना डॉक्टरांनी पुढील काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. तर काही रिपोर्टमध्ये असं सांगण्यात येत आहे की कमल हासन यांची प्रकृती खूपच गंभीर आहे.

मात्र, कमल हसन यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नुकतीच कमल हासन यांनी हैदराबादमध्ये त्यांचे गुरू आणि दिग्गज दिग्दर्शक के विश्वनाथ यांची भेट घेतली. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com