Game Changer Release Date Saam Tv
मनोरंजन बातम्या

Game Changer Release Date: राम चरण- कियाराचा बिगबजेट 'गेम चेंजर' कधी प्रदर्शित होणार?; समोर आली महत्वाची अपडेट

Chetan Bodke

Game Changer Release Date Rumours

दाक्षिणात्य अभिनेता रामचरणची ‘RRR’ चित्रपटापासून सर्वाधिक प्रकाशझोतात आला. या चित्रपटापासून त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. रामचरण लवकरच ‘गेम चेंजर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाबद्दलच्या अपडेट्स अनेकदा सोशल मीडियावर आलेल्या आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये, चित्रपटाबद्दलची कमालीची उत्सुकता आहे. सध्या चाहत्यांमध्ये चित्रपटाच्या रिलीज डेटची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. (Tollywood)

पॉलिटिकल ॲक्शन थ्रिलर ‘गेम चेंजर’ चित्रपटाचे दिग्दर्शन एस. शंकर करत आहे. अनेकदा सोशल मीडियावर चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडीओ जाहीर झाले होते. तेव्हापासून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दलची उत्सुकता आहे. सध्या सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची चर्चा होत आहे. चित्रपट येत्या ३१ ऑक्टोबर २०२४ ला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निर्माते ३१ ऑक्टोबर २०२४ ला रामचरण आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट रिलीज करणार असल्याची चर्चा आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत निर्मात्यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. (Films)

ऑक्टोबर २०२४ मध्ये, ज्युनियर एनटीआरचा 'देवरा', रजनीकांत यांचा 'वेट्टियाँ' हे चित्रपट एकाच दिवशी थिएटरमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. अद्याप दोन्हीही चित्रपटांची रिलीज डेट जाहीर झालेली नाही. सोबतच, रामचरणचा ‘गेम चेंजर’ चित्रपटही ३१ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. जर हे तिनही चित्रपट एकाच महिन्यामध्ये रिलीज झाले, तर सर्वाधिक कमाई कोणता चित्रपट करणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

'गेम चेंजर' चित्रपट केव्हा रिलीज होणार, अद्याप हे गुलदस्त्यातच आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या OTT राईट्बद्दल एक अपडेट समोर आली होती. मीडिया रिपोर्टनुसार, ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या साऊथ व्हर्जनचे ओटीटी राईट्स ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ने १०५ कोटींना विकले आहेत. तर हिंदी व्हर्जनचे ओटीटी राईट्स ‘झी ५’ (Zee 5) विकत घेण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.

चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्माते पाण्यासारखा पैसा खर्च करताना पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी चित्रपटाच्या गाण्यांवर ४० ते ५० कोटी रुपये खर्च केले आहेत. इतकंच नाही तर, चित्रपटामध्ये ट्रेनचा एक ॲक्शन सीन आहे, जो सुमारे ७ मिनिटांचा असणार आहे. केवळ त्या सीन्ससाठी निर्मात्यांनी तब्बल किंमत ७० कोटी रुपये खर्च केल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाची निर्मिती ३५० कोटी रुपयांमध्ये झाली आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT