Jui Gadkari Fan Create Actress Fake Account Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jui Gadkari News : 'फॅनपेज बनवण्यापर्यंत ठिकेय, पण...', फेक अकाऊंट बनवून चाहत्यांची फसवणूक केल्यामुळे जुई गडकरी संतापली

Jui Gadkari Fan Create Actress Fake Account : अभिनेत्री जुई गडकरी हिच्या नावाचं खोटं अकाऊंट बनवून चाहत्यांची फसवणूक केली जात आहे. अभिनेत्रीने हा सर्व प्रकार इन्स्टा स्टोरी शेअर करत चाहत्यांना सावध केले आहे.

Chetan Bodke

मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी तिच्या 'ठरलं तर मग' या मालिकेमुळे नेहमीच चर्चेत असते. या मालिकेमुळे अभिनेत्रीला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. अभिनेत्रीचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. काहीवेळा अभिनेत्रीला नेटकऱ्यांकडून धमक्यांचाही मॅसेज आला होता. आता त्यानंतर अभिनेत्रीच्या नावाचं खोटं अकाऊंट बनवून चाहत्यांची फसवणूक केली जात आहे. अभिनेत्रीने हा सर्व प्रकार इन्स्टा स्टोरी शेअर करत चाहत्यांना सावध केले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी जुई गडकरीला एका चाहतीने फॉलो कर अन्यथा तुला जेलमध्ये टाक... थेट अशीच धमकी तिला मॅसेज मधून दिलेली होती. आता अभिनेत्रीच्या नावाचं अकाऊंट बनवून तिच्या चाहत्यांची फसवणूक केली जात आहे. अभिनेत्रीने याबद्दलची माहिती अभिनेत्रीने इन्स्टास्टोरी शेअर करत दिलेली आहे. जुई गडकरीच्या नावाने एका युजरने फेक अकाऊंट क्रिएट केलेले आहे. त्यावरून तो तिच्या चाहत्यांशी जुईच्या नावाने चॅटिंग करून चाहत्यांची फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे.

Jui Gadkari Instagram Story

इन्स्टा स्टोरी शेअर करत जुई गडकरीने कॅप्शन लिहिले की, "सेलिब्रिटींचं फॅनपेज बनवण्यापर्यंत ठिक आहे. पण माझ्या नावाने फेक अकाऊंट बनवून चाहत्यांची फसवणूक करणं चुकीचं आहे. कृपया या अकाऊंटवरून मेसेज आल्यास उत्तर देऊ नका. कृपया हे अकाऊंट रिपोर्ट करा..." असं कॅप्शन लिहिलं आहे. तर पुढे अभिनेत्रीने माझं अकाऊंट व्हेरिफाईड आहे, त्यावर ब्लू टिकही आहे. @juigadkariofficial हे माझं अकाऊंट आहे.

जुई गडकरीच्या कामाबद्दल सांगायचे तर, 'पुढचं पाऊल' या मालिकेतून अभिनेत्रीला महाराष्ट्रातल्या घराघरांत लोकप्रियता मिळाली आहे. त्यासोबतच ती 'बिग बॉस मराठी' या रिॲलिटी शोमध्येही दिसली होती. सध्या जुई स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

SCROLL FOR NEXT