Chhatrapati Sambhajinagar/Nagpur News: फेसबुक हॅकरकडून महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे. राज्यातील तीन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट उघडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेययांच्या नावााने बनावट फेसबूक अकाउंट उघडण्यात आले आहे. आस्तिककुमार पांडेय यांनी या संदर्भात पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. बनावट अकाउंटवरून आलेली फेसबूक फ्रेंड रिक्वेस्ट कोणीही स्वीकारू नये असे आवाहन देखील आस्तिक कुमार पांडेय यांनी केले आहे. (Marathi Tajya Batmya)
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांव्यतिरिक्त यवतमाळ आणि नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने देखील बनावट फेसबूक अकाउंट बनवल्याची घटना उघडकीस आली आहे. (Latest Political News)
नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांचं फेसबूक अकाउंट हॅक झालं आहे. विपीन ईटनकर यांचा फोटो वापरुन नवीन अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. फेक फेसबूक अकाऊंटला रिस्पॅान्स न करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी केले आहे. यापूर्वीही विपीन ईटनकर यांचं फेसबुक अकाउंट हॅक झालं होतं. त्याबाबत त्यांनी सायबर सेलकडे तक्रार देखील केली होती. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.