Tharala Tar Mag Video saam tv
मनोरंजन बातम्या

Tharala Tar Mag Video : नवऱ्याचं अफेअर अस्मिताला कळलं; अर्जुनने थेट कानशिलात लगावली, मालिकेत येणार 'हे' धक्कादायक वळण

Tharala Tar Mag-Asmita Caught Husband Affair : 'ठरलं तर मग' मालिकेत आता धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. अस्मिताच्या नवऱ्याचे अफेअर सुभेदार कुटुंबाला कळले आहे.

Shreya Maskar

'ठरलं तर मग' मालिकेत अस्मिता नवऱ्याला साक्षीसोबत रंगेहाथ पकडते.

अस्मिता नवऱ्याला अन् साक्षीला किस करताना पाहते.

अर्जुन अस्मिताच्या नवऱ्याच्या थोबाडीत मारतो.

'ठरलं तर मग' मालिका सध्या रंजक वळणावर सुरू आहे. एकाच वेळी मालिकेत अनेक गोष्टी घडताना दिसत आहे. अलिकडेच अर्जुनला अस्मिताच्या नवऱ्याचे अफेअर समजले आहे. अर्जुनने अस्मिताच्या नवऱ्याला आणि साक्षीला रोमान्स करताना रंगेहाथ पकडतो. अस्मिताचा नवरा सचिन हा साक्षीला डेट करत आहे. अस्मिताला वारंवार फसवत आहे.अस्मिता लवकरच सचिनच्या बाळाची आई होणार आहे. अशात आता सुभेदारांच्या घरात मोठे वादळ आले आहे.

सचिन आणि साक्षीचे अफेअर अखेर अस्मिताला समजले आहे. संपूर्ण सुभेदार कुटुंब सचिनच्या विरोधात पाहायला मिळत आहे. याचा खास प्रोमो नुकताच समोर आला आहे. आपल्या बहिणीचे आयुष्य खराब करणारी ही साक्षी शिखरे आहे, हे अद्याप अर्जुनला माहित नाही. जेव्हा हे अर्जुनला समजेल तेव्हा सायली आणि सुभेदार कुटुंब नेमकं काय करणार, पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अस्मिता आणि कल्पना बाहेर गेले असताना अस्मिता सचिनला साक्षीसोबत रोमान्स करताना पाहते. ते दोघे किस करत असतात. हे पाहून अस्मिताला मोठा धक्का बसतो तिला चक्कर येते. त्यानंतर दोघी घरी येतात. अस्मिता सचिनला जाब विचारते. तेव्हा सचिन ती मुलगी ऑफिसची सहकारी असल्याचे सांगतो. हे ऐकताच अर्जुन त्याच्या थोबाडीत मारतो. त्यानंतर अर्जुन सर्वांना सांगतो की, सचिनच्या अफेअरबद्दल मला आधीच माहित होते.

सुभेदारांच्या घरात टेन्शन सुरू असताना तेवढ्यात पूर्णा आजी तेथे येते आणि अर्जुनला सचिनला मारण्यापासून थांबवते. आता पूर्णा आजी सचिनला कोणती शिक्षा करणार? अस्मिता-सचिनच्या नात्याचे काय होणार? हे सर्व पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पूर्णा आजीच्या येण्याने मालिकेला आता नवीन वळण आले आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील मालिका पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. 'ठरलं तर मग' मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर संध्याकाळी 8.30 वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबई हादरली! मध्यरात्री रिसॉर्टमध्ये गोळीबार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Skin Care: तुमच्या चेहऱ्यासाठी कोणता फेसवॉश बेस्ट? स्किन टाइपनुसार करा योग्य निवड

Reheated rice: कालचा भात गरम करून खाण्यापूर्वी हे नक्की वाचा; एका चुकीमुळे होईल फूड पॉइझनिंग!

Kuchu Puchu Meaning : कुचू-पुचू म्हणजे नेमकं काय? व्हायरल होणाऱ्या Gen Z स्लँग्सचा मजेशीर अर्थ जाणून घ्या

Ratnadurg Fort : रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यात दडली आहेत अनेक रहस्ये, एकदा जाणून घ्याच

SCROLL FOR NEXT